Pune Slab Collapses | पुण्याच्या बालेवाडीतील ‘अ‍ॅवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन’ साईटवर स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी, साईराज बिल्डकॉनच्या तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाकड येथील अ‍ॅवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन साईटवर (Avon Vista Construction) स्लॅब कोसळून 7 कामगार जखमी झाल्याची घटना (Pune Slab Collapses) घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना (Pune Slab Collapses) शनिवारी (दि.30) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली आहे.

 

नंदु हरी निषाद (वय-29), कार्तिक रुपराय निषाद (वय-18), राजेशकुमार गणीराम यादव (वय-21), दुर्गेश लक्ष्मीनारायण निषाद (वय-30), रविशंकर बिधीलाल साहु (वय-30), लक्ष्मणकुमार (वय-22), रामरतन निषाद (वय-27 सर्व रा. बिलासपुर, राज्य छत्तीसगड) असे जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. साईराज बिल्डकॉनचे (Sairaj Buildcon) सिनिअर इंजिनिअर देवेंद्र गायकवाड (Devendra Gaikwad), ज्युनिअर इंजिनिअर अजय ढगे (Ajay Dhage), साईट सुपरवायझर तरुण मालदार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक पोपट निमगिरे (PSI Ashok Popat Nimgire)यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील अ‍ॅवॉन विस्टा कन्स्ट्रक्शन बांधकाम साईटवर पोडीयम पार्कींगच्या (podium parking) स्लॅबचे बांधकाम सुरु आहे.
स्लॅब टाकण्यासाठी उभारलेली सपोर्टींग स्टेज सॅबच्या आकारानुसार वजन पेलवण्या इतपत
मजबुत नसताना आरोपींनी कामगारांना त्याठिकाणी स्लॅबचे (Pune Slab Collapses) काम करण्यास सांगितले.
वजन पेलवले नसल्याने स्लॅब कोसळून सात मजूर जखमी झाले. आरोपींच्या निष्काळजीपणामुळे
आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे समोर आले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Slab Collapses | 7 injured as slab collapses at Avon Vista Construction site in Balewadi, Pune, FIR against three of Sairaj Buildcon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCB Officer Sameer Wankhede | समीर वानखेडेंना मोठा दिलासा ! धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही – राष्ट्रीय मागासवर्ग आयोग

Post Office Scheme | फायद्याची गोष्ट ! 1500 रुपये दरमहा जमा केल्यास मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सर्वकाही

Pimpri Corona | दिलासादायक ! पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 88 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी