Pune : सांबराच्या शिंगांची तस्करी करणार्‍यास अटक, गुन्हे शाखेकडून 3 शिंगे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अवैधरित्या सांबराची शिंगे विक्री करणाऱ्यास युनिट-६च्या पथकाने फुलगाव फाटा (ता. हवेली) येथे जेरबंद केले. त्यांच्याकडून सांबर जातीच्या प्राण्याची ३ शिंगे, एक अ‍ॅक्टिवा मोपेड असा एकूण ३५ हजाररुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

प्रवीण दिलीप शिंदे (वय २७, रा. मु.पो. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, युनिट-६ चे पथक गस्त घालत होते, त्यावेळी नितीन मुंढे यांना एक इसम तस्करी केलेल्या सांबराची शिंगांची विक्री करण्यासाठी अ‍ॅक्टिवावरून फुलगाव फाटा (ता. हवेली) परिसरात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या सूचनेनुसार फुलगाव फाटा येथे सापळा रचून प्रवीण दिलीप माने यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, सांबराची तीन शिंगे, अ‍ॅक्टिवा असा ३५ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. पुढील तपास युनिट-६ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट६-चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे, करण ढंगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.