Pune Coronavirus : कडक निर्बंध ! जाणून घ्या आता पुण्यात काय बंद आणि काय सुरु राहणार

पुणे : पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सहा हजारांवर पोहचली आहे. रुग्ण वाढत असताना मृतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनची चिंता वाढली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाने 1 ते 14 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाउन करण्याची मागणी केली होती. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांच्यासह आयएएस अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला.

अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लागू करण्यावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे तुर्तास तरी लॉकडाउनचा निर्णय लांबणीवर पडला आहे. असे असले तरी 1 एप्रिलआधी आणखी एक बैठक घेतली जाणार आहे. त्या बैठकीत कदाचित रुग्णसंख्येचा आढावा घेऊन लॉकडाउन करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. पण 30 मार्चपर्यंत निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. जर पुढील सात दिवसांत रुग्ण संख्या कमी झाली नाही तर 1 एप्रिलला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिली आहे.

पुण्यात काय सुरु रहाणार आणि काय बंद राहणार ?

– रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरु होणार
– लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद
– हॉटेलमध्ये फक्त 50 टक्के उपस्थितीला परवानगी
– हॉटेलात जेवण करण्यापेक्षा होम डिलिव्हरीचा पर्याय वापरण्याच्या सूचना
– नियमांचे पालन केले नाही तर 1 एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील
– उद्याग, बाग बगीचे फक्त सकाळीच सुरु राहणार
– मॉल, मार्केट, चित्रपटगृह क्षमतेच्या 50 टक्केच सुरू राहणार
– सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार

नवीन नियम

– खासगी रुग्णालयात सुरुवातीच्या काळात 80 टक्के बेड घेतले होते. आता 50 टक्के बेड कोरोनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
– 1 तारखेपासून सर्वच लोकप्रतिनिधींनी खासगी कार्यक्रम पूर्णपणे बंद केले पाहिजेत.
– लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक संख्या अजिबात नको. अंत्यविधीसाठी 20 लोकांना परवानगी असेल.