अतिक्रमण काढताना अधिकार्‍याला धक्काबुक्की

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनाधिकृत पथारीवाल्यांवर सुरू असणार्‍या कारवाईदरम्यान अधिकार्‍यास धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरेगांव पार्क परिसरात ही घटना घडली आहे.

दीपक उर्फ आण्णा गायकवाड (रा. ताडीवाला रस्ता ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहूल इचके यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूल इचके सहायक अतिक्रमण विभागात नोकरीस आहेत. शनिवारी संध्याकाळी ते ससून रस्त्यावर रुबी हॉस्पिटलगत अनाधिकृत पथारीवाल्यांसह फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करीत होते.

त्यावेळी दीपक उर्फ आण्णा याने राहूल यांनी कारवाई करु नये यासाठी अडथळा आणत त्यांचा मोबाईल हिसकावून घेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना धक्काबुक्की करीत कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव अधिक तपास करीत आहेत.