पुणे : चौकीतच पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मुलांच्या भांडणातील मुलांना शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना एक पुरुष व दोन महिलांनी शिवीगाळ केली. यानंतर पोलीस चौकीत जाऊन पोलिसांना धक्काबुक्की केली. हा प्रकार सहकारनगर येथे मंगळवारी (दि.१७) दुपारी घडला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

संतोष रामदास कुचेकर (40, तळजाई वसाहत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर दोन महिलांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिस नाईक प्रकाश मरजगे यांनी सहकार नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B01B51Z58O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6400efe2-8aa5-11e8-960b-5bf43c9dfc68′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथे काही मुलांमध्ये भांडण झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रकरणात भांडण करणार्‍या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिस नाईक मरजगे आणि पोलिस शिपाई मोरे हे दोघे मार्शल दुपारी साडेतीन वाजता माने गिरणीच्या मागे असलेल्या रमेश किराणा दुकान परिसरात गेले. त्यावेळी तेथे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलांनी त्यांना अपशब्द  वापरून शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही मार्शल पोलिस चौकीत गेल्यानंतर तेथे संतोष कुचेकर  याला घेऊन जाऊन तेथेही इतर महिला पोलिसांनाही शिवीगाळ करत त्यांना धुक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनी संतोष कुचेकर याला अटक केली आहे. तर दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.