Pune News : दस्त नोंदणीसाठी उपनिबंधक कार्यालय आज रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार, 3 टक्के स्टँप ड्युटीसाठी आजचा शेवटचा दिवस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दस्त नोंदणीसाठी ( property registration) तीन टक्के मुद्रांक शुल्क (Stamp duty)  आकारणीबाबत सवलतीचा लाभ घेण्यासाठी गुरुवारी (दि.31) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे दस्त नोंदणीसाठी ( property registration) बुधवारी दुय्यम निबंधक कार्यालयात (Office of the Deputy Registrar) नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान, गैरसोय टाळण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील (Office of the Deputy Registrar)दोस्त नोंदणी ( property registration) गुरुवारी (दि.31 डिसेंबर) नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक कार्यालयातून देण्यात आली आहे.

राज्य सरकारने गृह निर्माण क्षेत्राला चालना मिळावी, यासाठी 1 सप्टेंबर पासून मुद्रांक शुल्कात सवलत दिली होती. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होऊ नये, तसेच नागरिकांना दस्त नोंदवता यावेते, यासाठी डिसेंबर महिन्यात शनिवारीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्यात आली होती.

ज्या नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी 31 डिसेंबर पर्यंत स्टॅम्प खरेदी केले आहेत. त्यांना पुढील चार महिन्यांपर्यंत तीन टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे, असे नोंदणी व मुद्रांक कार्य़ालयाने सांगितले आहे.