Pune Temperature | महाबळेश्वरपेक्षा पुणे थंड! शहराच्या तापमानात नोंदली जातेय सातत्याने घट, राज्यात सर्वाधिक थंड शहर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दिवाळीपासून अचानक पुणे शहर आणि परिसरात गारठा वाढू लागला आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे (Pune Temperature) येथे 12.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. सरासरीच्या तुलनेत हे 3.2 अंशाने घटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधून (Rajasthan) येणारे थंड वारे आणि हिमालयीन पर्वत रांगांवर होत असलेली बर्फवृष्टी याचा एकत्रित परिणाम होऊन उत्तरेपाठोपाठ महाराष्ट्रातील किमान तापमानात घट (Pune Temperature) झाली आहे.

 

हवामान विभागाच्या (Meteorological Department) आकडेवारीनुसार, मागील 4 दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने घट होत आहे. मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी किंचित घट झाली आहे.

 

पुणे शहरात (Pune Temperature) रविवारी सकाळी 12.6 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. मागील 10 वर्षांत 30 ऑक्टोबर 2016 रोजीच शहरातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतके कमी झाले होते. हे दशकातील दुसरे निचांकी किमान तापमान आहे. देशात सीकर (पूर्व राजस्थान) आणि मंडला (पूर्व मध्य प्रदेश) येथे मैदानी भागात किमान तापमान 11 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

पुणे 12.6
लोहगाव 14.7
जळगाव 14
कोल्हापूर 17.7
महाबळेश्वर 13.8
नाशिक 13.3
सांगली 17.2
सातारा 14.3
सोलापूर 16.1
मुंबई 24
सांताक्रूझ 20.5
रत्नागिरी 22.2
पणजी 22.8
डहाणू 20.3
उस्मानाबाद 15.2
औरंगाबाद 13
परभणी 15.4
नांदेड 16.4
अकोला 17.8
गोंदिया 17
नागपूर 16.8

 

Web Title :- Pune Temperature | pune is the coldest in the state the temperature in the city has been decreasing continuously for the past few days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Airtel ग्राहकांसाठी गुड न्यूज! मोबाईल रिचार्ज करा आणि मिळवा 25 टक्के कॅशबॅक!

Indian Medical Association | इंडीयन मेडीकल अशोशिएशनची वार्षिक बैठकीत डॉक्टरांची मारामारी

Maharashtra Politics | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्याने दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘आम्ही सदैव…’