पुणे : कार चाकलकाकडून पीएमपीएल बसचालकाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कारला धक्का लागल्याच्या कारणावरुन कार चालकाने पीएमपी बसचालकाला मारहाण केली. हा प्रकार रविवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास एनडीए रोडवर कोंढवे धावडे येथे घडला. याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

तर शिवनाथ बडे (30,आळंदी रोडी) या बसचालकाने उपचारानंतर उत्तमनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0775RDJNV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’05f9e0a6-8aac-11e8-9da8-d7a0165ba08a’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवनाथ बडे हे पीएमपीएमल बसचालक आहेत. ते रविवारी सायंकाळी एनडीए रोडने त्यांची बस घेऊन जात होते. त्यावेळी एनडीए रोडवर कोंढवे धावडे येथे खडकवासला धरणाच्या बाजूने रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून जाताना त्यांची बस थोडी तिरकी झाली. त्यावेळी समोरून बसच्या डाव्या बाजूने समोरून येणार्‍या एका कारला बसचा धक्का लागला. त्यामुळे कारचालकाने बसमध्ये येऊन त्यांना शिवीगाळ करत मारहाण करून दुखापत केली. त्यानंतर त्यांनी औषधोपचार करून कार्यालयातील वरिष्ठांनी हा प्रकार सांगितला आणि पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उत्तमनगर पोलिस करत आहेत.