पुण्यातील व्यापार्‍याने 130 कोटींची बनावट बिले, कंपन्या स्थापन करून बुडवला कोट्यवधीचा GST

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 130 कोटी रूपयांपेक्षा जास्त बनावट बिले देण्याच्या प्रकरणात एका मोठ्या व्यापार्‍याला अटक केली आहे. पुणे जीएसटी विभागाने अटक Arrested केलेल्या व्यापार्‍याचे नाव ओमप्रकाश तिरथदास सचदेव आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश देण्यात आला. Pune trader Omprakash Tirathdas Sachdev sinks Rs 130 crore fake bills sets up companies and sinks crores of GST

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याबाबत सहायक राज्य कर आयुक्त बी. वी. जुंबड यांनी सांगितले की,
ओमप्रकाश तिरथदास सचदेवने मे. श्री वाहेगुरु ग्लोबल माईन्स प्रा. लि. कंपनीच्या आपल्या आणि मे. ट्रेडर्स भावरे, मे. प्रकाश ट्रेडर्स, मे. अगरवाल इंटरप्रायजेस, मे. कोल्हे सेल्स, मे. किरण ट्रेडिंग कंपनी,
मे.
नारायण ट्रेडर्स, मे. काशमोरा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, मे. मरीकम्बा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड,
मे. सिओसिस प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी कंपन्यांना अन्य लोकांच्या नावावर सुरू करून त्या जीएसटी कायदा 2017 च्या अंतर्गत रजिस्टर केल्या.

cm uddhav thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी ‘या’ 7 जिल्ह्यांमुळं दिला अलर्ट, म्हणाले – ‘अनलॉक करण्याची घाई नको’

या कंपन्यांच्या माध्यमातून ओमप्रकाश तिरथदास सचदेवने 130.05 कोटी रुपयांची बनावट बिले देऊन,
19.79 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट पुढील खरेदीदारांना दिले.
हा टॅक्स भरावा लागू नये यासाठी त्याने अनेक बनावट कंपन्यांकडून कोणताही माल किंवा सेवा न करता पुरवठा केल्याच्या बनावट बिलांद्वारे 22.48 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले.

हा महाराष्ट्र जीएसटी GST कायद्याचे कलम 132 (ब) आणि (क) च्या अंतर्गत,
गुन्हा आणि आणि 132 (5) च्या अंतर्गत दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे.
याशिवाय कलम 132(1) (i) च्या अंतर्गत या गुन्ह्यासाठी 5 वर्षांचा करावास आणि शिक्षेची तरतूद आहे.
यानुसार या व्यापार्‍याला अटक करण्यात आली आहे.

Web Titel : Pune trader Omprakash Tirathdas Sachdev sinks Rs 130 crore fake bills sets up companies and sinks crores of GST

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Coronavirus in Pune | पुणेकरांनो, काळजी घ्या ! कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या वाढतीय, जाणून घ्या आजची आकडेवारी

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘हे सरकार आहे की सर्कस आहे?’ (व्हिडीओ)