Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘हे सरकार आहे की सर्कस आहे?’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis ) यांनी ठाकरे सरकारवर ( Thackeray government ) अत्यंत तिखट शब्दात हल्लाबोल केला आहे. कोरोनाचे (Corona) सर्वांत जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मृत्यूच्या सापळ्याच महाराष्ट्र मॉडेल या सरकारने तयार केले आहे. मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रात जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का? हे तर वसुली सरकार असल्याची घणाघाती टीका फडणीस यांनी केली आहे.

भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक (BJP state executive meeting) ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे. राज्यभरातून 1400 कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी व्हावी, असा ठराव या कार्यकारणीत मंजूर केला आहे. फडणवीस म्हणाले की, मंत्री आपापल्या विभागाचे राजे झाले आहेत आणि प्रत्येक विभागात एक वाझे आहे. वेगवेगळ्या विभागातले वाझे अजून बाकी आहेत, आणि त्यांचा पत्ता आमच्याकडे आहे. आपला भ्रष्टाचार आणि गोंधळ बाहेर येईल या भीतीने सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार यांनी बरबटलेल हे सरकार आहे. या सरकारमधला मंत्रीही स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. रोज निर्णय होतात एका तासात स्थगिती पुन्हा मंजूरी मिळते. हे सरकार आहे की सर्कस आहे? असा प्रश्न पडतोय, असे ते म्हणाले.

हे सरकार तर पळपुटं : फडणवीस
ओबीसी आरक्षण केवळ या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेले आहे. भाजपा 26 जूनला आंदोलन करून शांत बसणार नाही. जर ओबीसीला फसवाल तर खबरदार भाजप शांत बसणार नाही. लोकशाहीमध्ये विधानमंडळाचं दार यांनी बंद केले केले आहे. हे सरकार पळपुटं असल्याचा घणाघाती आरोप फडणवीस यांनी केला आहे.

हे देखील वाचा

New Wage Code | लागोपाठ 5 तासांपेक्षा जास्त काम करू शकत नाहीत कर्मचारी ! 30 मिनिटाचा ब्रेक देणे आवश्यक, जाणून घ्या नवीन नियम

 

Gold Rate Today । सोन्याचे दर पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचे दर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : devendra fadnavis | former cm devendra fadnavis took dig at cm uddhav thackeray and maharashtra govt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update