Pune Traffic Jam | पुणे शहर वाहतूक पोलिस नियोजनात ‘फेल’ ! शहरभरातील वाहतूक कोंडीमुळे ऐन दिवाळीत पोलिसांच्या नावाने ‘शिमगा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   सणासुदीच्या काळांत चौकातील वाहतूक नियंत्रीत करण्याऐवजी आडोशाला थांबून ‘सावज’ टिपणार्‍या वाहतूक पोलिसांमुळे आज दिवसभर शहरातील वाहतुकीचा ‘विचका’ झाला (Pune Traffic Jam). दिवाळीनिमित्त शनिवारी सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी मध्यवर्ती शहरात गर्दी होण्याची शक्यता असताना शहर पोलिसांनी कुठलेच नियोजन केले नसल्याने झालेल्या अभूतपुर्व वाहतूक कोंडीमुळे (Pune Traffic Jam) वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला.

 

पुढील आठवड्यात साजर्‍या होत असलेल्या दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या शनिवारी मध्यवर्ती बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी (Pune Traffic Jam) झाली होती.
सकाळी ११ वाजल्यापासूनच शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अशातच मध्यवर्ती भागातील बाजीराव रस्ता (Bajirao Raod) आणि शिवाजी रस्त्यावरही (Shivaji Road) ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदाई करण्यात आल्याची त्यात भरच पडली होती.
संध्याकाळी शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, दरम्यानचा मंडई परिसर तसेच नारायण पेठेतील (Narayan Peth) बाबा भिडे पूलही (baba bhide bridge pune) गर्दीने वेढला होता.

टिळक चौकातही (Tilak Chowk, Pune) पाचही रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
मात्र वाहतूक पोलिस टिळक चौकाकडून कुमठेकर रस्त्याकडे जाणार्‍या बाजूला पोलिस सिग्नल तोडून येणार्‍या वाहनांना पोलिस अडवत (Pune Traffic Jam) होते.
परंतू पुढेच मुरलीधर हॉटेलसमोरील चौकामध्ये चारही बाजूने येणार्‍या वाहने समोरासमोर उभी ठाकल्याने वाहतूक अक्षरश: ब्लॉक झाली होती.
या कोंडीतून अवघे १०० मी. अंतर कापण्यासाठी एक तासांहून अधिक वेळ लागत होता.
भिडे पुलाजवळ नदी पात्रात रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेल्या फोर व्हिलरमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
नदीपात्रातील रस्त्याने रुग्ण घेउन निघालेली ऍम्ब्युलन्सदेखिल सायरन वाजवत एक तास गर्दीत अडकली होती.
दरम्यान, रात्री दत्तवाडी (Dattawadi) येथे मोठ्या व्यासाची जलवाहीनी फुटल्याने तिच्या दुरूस्तीच्या कामामुळे सिंहगड रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी झाली होती.
दिवसभर या कोंडीचा सामना कराव्या लागलेले नागरिक मात्र ऐन दिवाळीमध्ये पोलिसांच्या नावाने ‘शिमगा’ करत होते.

 

Web Title : Pune Traffic Jam | Pune traffic police fail in planning of Diwali due to traffic congestion across the city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यात भंगार व्यवसायिकाला अपहरण करत बेदम मारहाण; पोलिसांनी केलं ‘हे’ काम अन्…

PM Modi meets Pope Francis | तब्बल 22 वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांची पोप फ्रान्सिस यांच्याशी बैठक, दिलं भारत भेटीच निमंत्रण

Coastal Road Projects | वरळी कोळीवाड्यातील स्थानिक मच्छिमारांनी कोस्टल रोडचे काम पाडले बंद; आदित्य ठाकरेंवरही जोरदार टीका