Pune Traffic Police Updates | कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान जड वाहनांसाठी 40 कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Police Updates | मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Bangalore National Highway) वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कात्रज बोगदा (Katraj Tunnel) ते नवले पूलादरम्यान (Navale Bridge) वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांकरिता ४० कि.मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित केल्याचे अंतिम आदेश पुणे शहर वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आले आहेत.

राज्य शासन गृह विभागाच्या २७ सप्टेंबर १९९६ च्या अधिसूचनेनुसार अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांच्या सूचना व हरकतींवर विचार करुन हे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार टॅक्टर-ट्रेलर कॉम्बीनेशन, ट्रक-ट्रेलर, अर्टीक्युलेटेड व्हेइकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराच्या मालाची वाहतूक करणारी वाहने आदी जड, अवजड वाहनांसाठी ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, असेही पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Traffic Vijaykumar Magar) यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. (Pune Traffic Police Updates)

ADV

Electricity Connections In Pune | नवीन वीजजोडणी, नादुरुस्त मीटर बदलासाठी मीटरचा तुटवडा नाही

Delhi Court grants regular bail to BJP MP Brij Bhushan in sexual harassment case

NCP Political Crisis | शरद पवारांना आणखी एक धक्का, ‘या’ राज्यातील 7 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

Raigad Irsalwadi Landslide | पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं ! 98 जणांना वाचवण्यात यश तर 16 जणांचा मृत्यू; NDRF ची माहिती

ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच घेणाऱ्या महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक