Raigad Irsalwadi Landslide | पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं ! 98 जणांना वाचवण्यात यश तर 16 जणांचा मृत्यू; NDRF ची माहिती

रायगड: पोलीसनामा ऑनलाइन – Raigad Irsalwadi Landslide | रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पोटात वसलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला. मुसळधार पावसामुळे दरड कोसळून (Raigad Irsalwadi Landslide) झालेल्या दुर्दैवी घटेत 16 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एनडीआरएफने (NDRF) दिली आहे. बचाव पथकाला आतापर्यंत 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. सध्या याठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि दाट धुकं (Fog) असल्याने एनडीआरएफ आणि इतर यंत्रणांकडून सुरु असलेले बचावकार्य (Rescue Operations) थांबवण्यात आले आहे. उद्या शुक्रवारी पहाटे पाच वाजता पुन्हा बचावकार्य सुरु केले जाणार असल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातल्या माथेरान आणि आसपासच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत इर्शाळवाडीतील 48 पैकी 17 घरे माती खाली गाडली (Raigad Irsalwadi Landslide) गेली. या दुर्घटनेत जवळपास 20 घरांचे गंभीर नुकसान झाले आहे. तर उरलेली दहा घरं वाचली आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकं तासाभरात घटनास्थळी दाखल झाली. मात्र पाऊस आणि अंधारामुळं बचावकार्य सकाळीच सुरु करण्यात आलं. गुरुवारी दिवसभर पाऊस असल्याने बचाव पथकाची चांगलीच तारांबळ झाली.

अनेक संस्था मदतीसाठी सरसावल्या

पावसामुळे माती निसरडी झाल्याने घटना स्थळापर्यंत पोहचण्यासाठी पथकांना खूप कष्ट घ्यावे लागले. त्यामुळे रात्री बचावकार्य आणि मदत कार्य़ सुरु करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे सकाळी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही घटना घडल्याने मदतीसाठी कोणतीही साधने आणता येणे शक्य नाही. त्यामुळे केवळ माणसांच्या मदतीनेच याठिकाणी मदत पोहचवणे शक्य होत आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ (SDRF), टीडीआरएफ (TDRF) यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू करण्यात आले. त्याशिवाय, ट्रेकर्स ग्रुप (Trekkers Group), स्वयंसेवी संस्था (NGO) देखील मदतीसाठी सरसावल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन घेतला आढावा

घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतला. त्याशिवाय मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan), आमदार महेश बालदी (MLA Mahesh Baldi) यांनी मध्यारात्रीच घटनास्थळ गाठले होते. मध्यरात्रीपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संपर्कात होते. तर सकाळच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नियंत्रण कक्षातून (Control Room) मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत यंत्रणांना सूचना दिल्या.

याशिवाय मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant),
दादा भुसे (Dada Bhuse), अनिल पाटील (Anil Patil),
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve),
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Shiv Sena leader Aaditya Thackeray),
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले
(Congress State President MLA Nana Patole), मनसे नेते बाळा नांदगावकर
(MNS Leader Bala Nandgaonkar) आदी नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Raigad Irshalwadi Landslide | ‘दुर्घटनाग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी 50 कंटेनर्स,
गावकऱ्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच घेणाऱ्या
महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक