Pune Traffic Updates | शहराच्या मध्यभागातील वाहतुकीत बुधवारपासून बदल

Pune Traffic News Updates | Major traffic changes in the city in view of Maghi Shri Ganesh Jayanti; Citizens are urged to use alternative routes
file photo

उत्सव कालावधीत शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक ते रामेश्वर चौक (मंडई) दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Traffic Updates | गणेश उत्सवादरम्यान भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन बुधवारपासून (२० सप्टेंबर) शहराच्या मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार  आहेत. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सायंकाळी पाच वाजल्या नंतर मध्यभागातील रस्ते वाहतुकीस बंद  करुन वाहतूक  पर्यायी मार्गाने  वळविण्यात येणार आहे. उत्सवा दरम्यानच्या कालावधीत शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौक ते रामेश्वर चौक (मंडई) दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार  आहे. (Pune Traffic Updates)

मध्यभागातील वाहतूक बदल हे विसर्जन मिरवणुकीपर्यंत लागू असणार आहेत. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व वाहनांनी जंगली महाराज रस्त्यावरील (जेएम रोड) स. गो. बर्वे चौक (माॅडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडोजीबाबा चौक,  टिळक चौकातून (अलका टॉकीज) टिळक रस्ता किंवा शास्त्री रस्त्याने इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगर भागातून स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांनी सिमला चौक, शाहीर  अमर शेख चौक, बोल्हाई चौकमार्गे पुणे स्टेशनकडे किंवा नेहरु रस्त्याने स्वारगेटकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Traffic Vijaykumar Magar)  यांनी केले आहे. (Pune Traffic Updates)

शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणारे दुचाकीस्वार महापालिका भवन येथील टिळक पूल, नदीपात्रातील रस्त्यावरुन अलका चित्रपटगृहमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील. बाजीराव रस्ता, तसेच केळकर रस्त्यावरुन येणाऱ्या वाहनांनी अप्पा बळवंत चौक, फुटका बुरूज चौक, गाडगीळ पुतळा, कुंभारवेस मार्गे इच्छितस्थळी जावे.

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते बेलबाग चौक, रामेश्वर चौक ते मंडई, शनिपार चौक, सेवासदन चौक ते अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, अप्पा बळवंत चौक ते फुटका बुरूज चौक या भागात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. २० ते २७ सप्टेंबर या कालावधीत 
सायंकाळी पाचनंतर गर्दी ओसरेपर्यंत कुमठेकर रस्ता, सदाशिव पेठ, घोरपडे पेठेतील सिंहगड गॅरेज रस्ता, महापालिका कार्यशाळा चौक, 
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील कोहिनूर चौक ते भगवान महावीर चौक दरम्यान असलेल्या एकेरी वाहतुकीचे आदेश शिथिल करण्यात येणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | विश्रांतवाडी: टिंगरेनगरमध्ये वडिलाचा मुलाने केला खून

Jio Air Fiber launched in 8 cities including Pune | पुण्यासह 8 शहरांमध्ये जिओ एअर फायबर लाँच !
केबलशिवाय अल्ट्रा हाय स्पीड मिळणार

CM Eknath Shinde | ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना ! “सर्वसामान्यांना सुख,
समृध्दी मिळू दे”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

Total
0
Shares
Related Posts
Mahavikas-Aghadi

Mahavikas Aghadi On Mahayuti | ‘महाराष्ट्र हा मोदी- शहा गुलामांची वसाहत’, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत’