Lockdown : शहरात दोन घरफोड्या, लाखोंचा ऐवज चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लॉकडाऊन असताना देखील घरे फोडणाऱ्या चोरट्यांनी त्यांची कामगिरी चोख पार पडली असून, दोन बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. पाषाण व खराडी येथे या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी चंदननगर व चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खराडी परिसरातील प्रतिक राजेंद्र नहार (वय ३०) हे येथील अजमेरा टायर्सजवळ राहतात. दरम्यान त्यांच्या पत्नीचे 29 मार्च रोजी ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे ते भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप उटकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी फ्लॅटमधील एक लाख ९१ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने व रोख एक लाख १८ हजार रूपये असा 3 लाख रुपयांचा ऐवज घरफोडी करून नेला. फिर्यादी हे रात्री परतआले असता त्यांना फ्लॅटमध्ये घरफोडी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी चंदनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

तर दुसरी घटना पाषाण येथे घडली आहे. येथील संजीत सहाणी (वय ३६) यांचे बंद असलेले इलेट्रीकलचे दुकान फोडले आहे. दुकानातून दोन फॅन चोरून नेले आहेत.

उन्हाळा सुरू झाल्यानंतर चोरट्यांनी फॅन चोरून नेल्याची चर्चा पाषाण परिसरात सुरू आहे. २९ मार्च रोजी रात्री नेहमी प्रमाणे त्यांचे दुकान बंद करून गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यानंतर त्यांना दुकानातून दोन फॅन चोरून नेल्याचे आढळून आले. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह. अधिक तपास चतुःश्रुंगी पोलिस करत आहेत.