Pune Viman Nagar Crime | पुणे : भांडण सोडवणं पडलं महागात, तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Viman Nagar Crime | दोघांमधील भांडण सोडवणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. भांडण सोडवण्याच्या कारणावरुन दोन जणांनी एका तरुणाला कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले (Stabbing Case). हा प्रकार शुक्रवारी (दि.22) रात्री दहाच्या सुमारास साकोरेनगर येथील बजाज फिन्सर कंपनीसमोर घडला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Viman Nagar Crime)

तुषार राजु बनसोडे (वय-28 रा. सम्राट चौक, विमाननगर, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने शनिवारी (दि.23) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रोहीत विजय कांबळे उर्फ नॉडी उर्फ सोन्या (वय-18 रा. संजयपार्क, एअरपोर्ट रोड, पुणे), प्रज्वल महादेव शिंदे (वय-19 रा. आर्यानगर, विमाननगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 324, 34 सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार याचा मित्र अभिजीत चव्हाण याचे आरोपींसोबत तसेच त्यांच्या आई-वडिलांसोबत भांडण सुरु होते. भांडण सोडवण्यासाठी तुषार हा गेला असता त्याचा राग आरोपींना आला. याच रागातून आरोपीने कंमरेला लावलेला लोखंडी कोयता काढून फिर्यादी च्या डोक्यात मारला. तसेच हाताच्या बोटावर वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस नाईक जी.व्ही. नाणेकर करीत आहेत.

जुन्या भांडणातून तरुणाला मारहाण

कोंढवा (Kondhwa) : पूर्वी झालेली भांडणे मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाला शिवीगाळ करुन
लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रस्त्यावर पडलेल्या सिमेंटचा गट्टु उचलून डोक्यात मारुन जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.22) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोंढवा येथील व्हि.आय.आय.टी कॉलेज (VIIT College Kondhwa) जवळ घडला. याप्रकरणी शकील रमजान तांबोळी (वय-21 रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विकास व शैलेश (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्हि.के बाबर (API VK Babar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil-Maratha Community | मनोज जरांगेंची मराठा समाज बैठकीत मोठी घोषणा! राजकीय पक्षांचं टेन्शन वाढणार, लोकसभा निवडणुकीत प्रत्येक जिल्ह्यात…

Pimpri Chinchwad Cyber Police | पिंपरी : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करुन जास्त निफा मिळवून देणाऱ्या आरोपींचे धागेदोरे बँकॉक पर्यंत (Video)

Pune Crime Branch | पुणे : सख्ख्या मेहुण्याला मारण्यासाठी मध्यप्रदेशातील पैलवानाला सुपारी, गुन्हे शाखेकडून दोघांना अटक

Sharad Pawar On Modi Govt | शरद पवारांचा मोदी सरकारवर घणाघात, काँग्रेसचे बँक खाते या लोकांनी गोठवले, उद्या तुमचेही…

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : दुचाकी व हायवाच्या अपघातात महिलेचा मृत्यू, एक जखमी

Bacchu Kadu On Amravati Lok Sabha | अमरावतीची जागा भाजपाला गेल्याने बच्चू कडू संतापले, ”…तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”