Pune : खेड सभापती विरोधातील अविश्वास ठरावावर आज निर्णय; राजगुरूनगरमध्ये संचारबंदी

राजगुरूनगर : खेड पंचायत समिती (khed panchayat samiti) सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात आलेल्या अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा आज असल्याने राजगुरूनगरमध्ये कलम १४४ (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आलं आहे. खेड  पंचायत समिती (khed panchayat samiti)  इमारतीच्या आसपास अर्धा किलोमीटरपर्यंत कोणासही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश; निश्चित होईल फायदा, जाणून घ्या

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय १४ पैकी ११ जणांच्या वतीने दि २४ मे रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. व सदस्य राजकीय सहलीसाठी गेले होते. डोणजे येथील एका रिसोर्ट मध्ये पंचायत समिती सदस्य मुक्कामी असलेल्या ठिकाणी सभापती पोखरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन धिंगाणा घातला होता. याप्रकरणी सभापती पोखरकर यांना दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली आहे. दरम्यान प्रांताधिकाऱ्यानी आज अविश्वास ठरावासाठी विशेष सभा बोलावली आहे. सभापती भगवान पोखरकर यांना सभेत भाग घेण्यासाठी न्यायालयीन परवानगी मिळाली आहे. पोलिस बंदोबस्तामध्ये त्यांना राजगुरूनगर येथे आणण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजगुरूनगरमध्ये आज सकाळी ६ वाजलेपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथकाची तुकडी, राज्य राखीव पोलीस दलाचे दोन प्लाटून तैनात असल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

 

Also Read This : 

 

CBSE, ICSE बोर्डाच्या 12 वी च्या परीक्षा होणार की नाही ?, विद्यार्थ्यांचे भवितव्य अद्याप अनिश्चित

 

पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या

 

पैलवान सुशीलकुमारची दुकानदाराला मारहाण, स्टेडिअममध्ये साहित्य पुरवल्याचे पैसे मागतिल्याने मारहाण झाल्याचा आरोप

 

 

दिवसाला 5 बदाम वाढवतील तुमची ‘इम्यून’ पावर, पाण्यात भिजवून खावे, जाणून घ्या

 

WhatsApp वर 3 लाल टिक खरंच येणार का? Viral मेसेजमधील काय आहे सत्य? जाणून घ्या

 

 

सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच