Pune Wagholi Crime | ‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Hadapsar Pune Crime News | Man beaten with wood to withdraw case, gives son to wife in custody, injures her

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wagholi Crime | नवी घर शोधण्यासाठी गेलेल्या महिलेला ‘हा एरिया माझा आहे’ असे म्हणत पाईपने बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) रात्री आठच्या सुमारास वाघोली परिसरातील खांदवेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याशेजारी घडला आहे.

याबाबत ज्योती एकनाथ शेलार (वय-38 रा. राजराम पाटील नगर, खराडी, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन परशुराम शिवाजी पवार (वय-31 रा. खांदवेनगर, वाघोली, पुणे) याच्यावर आयपीसी 324 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी ओळखीचे असून आरोपी कराटे शिक्षक आहे.(Pune Wagholi Crime)

फिर्यादी यांचा मुलगा व मुलगी आरोपीकडे कराटे प्रशिक्षणासाठी जात होते. मात्र, मागिल तीन ते चार महिन्यापासून ते आरोपीकडे जात नव्हते. मंगळवारी फिर्यादी त्यांच्या मुलीला घेऊन वाघोली परिसरातील खांदवेनगर येथे नवीन घर शोधण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने ‘हा एरिया माझा आहे’ असे म्हणून महिलेला प्लास्टीकच्या पाईपने बेदम मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पत्नी व मुलाला काठीने मारहाण

लोणीकंद : बदनामी का करता अशी विचारणा केल्याच्या रागातून शिवीगाळ करुन पत्नी आणि मुलाला काठीने मारहाण
करुन बघुन घेण्याची धमकी दिली. हा प्रकार लोणीकंद परिसरातील जाधव वस्ती येथे मंगळवारी (दि.20) रात्री नऊच्या
सुमारास घडली. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena UBT MP Sanjay Raut | मोदींइतकी श्रीमंती ७० वर्षांत कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नाही, संजय राऊत यांचे टीकास्त्र

Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी

Pune Kondhwa Crime | रस्त्याने जाणाऱ्या तरुणीचे तोंड दाबून गैरवर्तन, आरोपीला अटक; कोंढवा परिसरातील प्रकार

Pune News | साहित्य परिषदेचा चालता बोलता इतिहास हरपला ! कवी, गझलकार दीपक करंदीकर यांचे निधन

Total
0
Shares
Related Posts
Pune PMC News | Katraj Kondhwa road work to be completed by March 2026 by acquiring land as per special law; Decision taken in meeting with District Collector - Information from Municipal Commissioner Naval Kishore Ram

Pune PMC News | विशेष कायद्यानुसार भूसंपादन करून कात्रज कोंढवा रस्त्याचे काम मार्च 2026 अखेर पूर्ण करणार; जिल्हाधिकार्‍यांसोबतच्या बैठकीत निर्णय – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती