Devendra Fadnavis | ”पुढची ५ वर्ष मागच्या १० वर्षांपेक्षा भारी असणार, गरीबी निर्मुलन होणार”, मोदींच्या तिसऱ्या टर्मवर फडणवीसांचे भाष्य

मुंबई : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (BJP President JP Nadda) यांच्या उपस्थितीत काल मुंबईत भाजपा कार्यकर्ता संमेलन (BJP Karyakarta Sammelan) आयोजित करण्यात आले होते. संमेलनाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात भारतात तिसऱ्यांदा भाजपा सरकार (BJP Govt) येणार आहे. विकसित भारताचे स्वप्न पुढील पाच वर्षात पूर्ण होईल. मागचा दहा वर्षांचा काळ फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. पुढची पाच वर्ष मागील दहा वर्षांपेक्षा भारी असणार आहेत.(Devendra Fadnavis)

मोदींच्या तिसऱ्या टर्मवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुढची पाच वर्ष विकासाची मुहूर्तमेढ रोवणारी, भारताला आर्थिक महासत्ता बनविणारी, गरीबी निर्मुलनाच्या अंतिम लढाईची असतील. या पाच वर्षात जगाला हेवा वाटावा, असा विकास होणार आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पंतप्रधान मोदींनीही भारताची सेवा करण्याचा संकल्प सोडलाय.
विकसित भारत करण्यासाठी आम्हाला तिसऱ्यांदा सत्ता हवी आहे.
मोदींच्या दहा वर्षांच्या काळात बदललेला भारत आणि जगात भारताची बदललेली प्रतिमा तुम्ही पाहिली.
भारताचा आत्मसन्मान, स्वाभिमान, आत्माभिमान बदलताना पाहिला. एक मजबूत भारत आपण पाहिला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतात रस्ते, रेल्वे आणि विमानतळ झाले. गरीबांना कल्याणाच्या योजना मिळाल्या.
घर, शौचालय, सिलेंडर मिळाले. तरुणाईला स्टार्टअपसाठी कर्ज मिळाले. अनेक योजना दहा वर्षात झाल्या. पुढील पाच वर्ष यापेक्षाही अधिक पटीने भारताची प्रगती होईल, असा दावा फडणवीसांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | ‘सगेसोयरे’साठी मराठा समाज आक्रमक! जरांगे म्हणाले ”आता २४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको, ३ मार्चला…”

Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तो भोंदू महाराज, मनोज जरांगेंचा अरोप