CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda | महायुतीच्या जागावाटपावर शिंदे-नड्डा यांच्यात महत्वाची चर्चा, राष्ट्रवादीची अनुपस्थिती खटकणारी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda) यांनी भेट दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपा आणि शिंदे गटाचे अनेक नेते उपस्थित होते. शिंदे, नड्डा आणि फडणवीस यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रमदेखील झाला. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar Group) कोणीही उपस्थित नव्हते, हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक तास चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections 2024) जागावाटप आणि इतर गोष्टींवर चर्चा झाल्याचे समजते. महायुती म्हणून कशाप्रकारे आगामी निवडणुका लढायच्या, तसेच विकासकामांबाबत चर्चा झाली. (CM Eknath Shinde – Bjp Leader JP Nadda )

मागील दोन-तीन दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपाचा कथित फार्म्युला सर्वत्र व्हायरल होत आहे.
याबाबत शिंदे गटाच्या नेत्यांनी काल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ३२-१२-४ असा हा फार्म्युला आहे.
मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

शिंदे गटाच्या लोकसभेच्या काही जागांवर भाजपाकडून दावा करण्यात येत असल्याने महायुतीचे जागावाटप नेत्यांसाठी
डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण, काही मतदार संघात दोन्हीकडील नेते दावे-प्रतिदावे आणि आव्हानं देत आहेत.

दरम्यान, कालच्या बैठकीला अजित पवार गटाला निमंत्रणच देण्यात आले नव्हते की, अजित पवार गटाने या बैठकीकडे पाठ फिरवली, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | ‘सगेसोयरे’साठी मराठा समाज आक्रमक! जरांगे म्हणाले ”आता २४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको, ३ मार्चला…”

Pune Hadapsar Crime | पुणे : कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकल्याच्या कारणावरुन महिलेला मारहाण, चार जणांवर विनयभंगाचा गुन्हा

Shivsena Shinde Group | महायुतीत जागावाटपावरून मीठाचा पहिला खडा पडला, शिंदे गटाचा नेता म्हणाला, ”शिवसेना भाजपाच्या दावणीला…”

Pune Yerawada Crime | मुलींमध्ये नाचल्याच्या कारणावरुन तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण, येरवडा परिसरातील घटना

Manoj Jarange Patil | अजय महाराज बारस्कर हा सरकारचा ट्रॅप, तो भोंदू महाराज, मनोज जरांगेंचा अरोप