Pune Wanwadi Crime | प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर बलात्कार, वानवडी परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Wanwadi Crime | तरुणीसोबत मैत्री करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार देऊन फसवणूक केली. हा प्रकार महंमदवाडी येथील पीडित महिलेच्या घरात आणि ती काम करत असलेल्या हॉटेलमध्ये जुला 2023 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत घडला आहे. (Pune Rape Case)

याबाबत महंमदवाडी येथे राहणाऱ्या 31 वर्षीय महिलेने सोमवारी (दि.26) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अजिम मुन्शी (रा. तरवडे वस्ती, हडपसर) याच्यावर आयपीसी 376, 376 (एन) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत.(Pune Wanwadi Crime)

आरोपीने फिर्यादी यांना फोन करुन, मी तुम्हा ओळखतो, तुम्ही कुठे राहता, काय काम करता याबाबत मला सर्व माहित आहे. तुम्ही मला आवडता, मली तुम्हाला भेटायचे आहे, असे म्हणून हांडेवाडी रोड येथे भेटण्यास बोलवले. पीडितेला भेटून आरोपीने तिच्यासोबत मैत्री केली. त्यानंतर तिच्या घरी जाऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच ती ज्या हॉटेलमध्ये काम करते त्या हॉटेलमध्ये देखील शारीरिक सबंध ठेवले. पीडितेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निटोणे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis | मनोज जरांगे पुन्हा संतापले, ”देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत, तुम्ही सगळ्यांनी शांत राहा”

SIT Investigate Manoj Jarange Movement | मोठी बातमी! भाजपाच्या मागणीनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश

FIR On Congress Workers In Pune | पुण्यात पंतप्रधानांचा पुतळा जाळल्या प्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल (Video)

Maratha Reservation Andolan | मराठा आरक्षण आंदोलन : 3 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंदमुळे 100 कोटींचा फटका