Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ प्रभागातील पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | गुरुवारी (दि. 16) पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 40 (Ward No. 40) येथील आगम मंदिर पंपिंग (Agam Mandir Pumping) येथे जलवाहिनी संबंधित काम केले जाणार आहे. तसेच प्रभाग क्रमांक 40 येथील सच्चाई माता ESR येथे फ्लो मीटर (Flow Meter) बसवण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे सच्चाई माता ESR वर अवलंबून असलेल्या भागांचा गुरुवारी (दि.16) पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

 

शुक्रवारी (दि.17) कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) ही माहिती दिली आहे.

 

पाणीपुरवठा बंद असणारा भाग
प्रभाग क्रमांक 40 मधील अंजलीनगर, संतोषनगर, साईनगर, दत्तनगर, टेल्को कॉलनी परिसर, सुंधामाता नगर, जांभुळवाडी रोड परिसर, प्रभाग क्रमांक 42 मधील शनिनगर, अटल 11 परिसर, भोलेनगर, वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द गावठाण.

 

 

Web Title :- Water supply in ward prabhag 40 of Pune will be cut off on Thursday

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा