Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Water Supply | गुरुवारी (दि. 3 मार्च) रोजी भामा आसखेड प्रकल्पाचे (Bhama Askhed Project) अखत्यारीतील विमाननगर (Viman Nagar) टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी भामा आसखेड प्रकल्पाच्या पंपिंगच्या अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी (दि.4) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

 

गुरुवारी (दि.3) भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील विमाननगर टाकीच्या मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनला जोडण्याचे काम केले जाणार आहे. तसेच लाईनवर फ्लो मीटर (Flow Meter) बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pawaskar) यांनी दिली.

 

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग
भामा आसखेड प्रकल्प विमाननगर परिसर – संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एस. आर. ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ इत्यादी.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to this area of ​​Pune city will be cut off on Thursday

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा