Shirur Lok Sabha Election 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का ! भाजप नेते अतुल देशमुख हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Shirur Lok Sabha Election 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) पक्षाने महायुतीला (Mahayuti) जोरदार धक्का दिला आहे. आळंदी विधानसभा मतदारसंघातील (Khed Alandi Vidhan Sabha) भाजप नेते अतुल देशमुख (Atul Deshmukh) यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचे स्वागत शरद पवार यांनी केले. यावेळी महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) उपस्थित होते.(Shirur Lok Sabha Election 2024)

भाजप नेते अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना मोठा फायदा होणार असून महायुतीला फटका बसणार आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अतुल देशमुख म्हणाले, मागील अडीच वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली. समन्वयही साधता आला नाही. मागील एक दीड वर्षात हीन वागणूक मिळाल्याने थांबण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करायचे ठरवले आहे. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नाहीत. शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या उमेदवारीनंतर भाजपत नाराजी आहे, असे देशमुख म्हणाले.

अतुल देशमुख हे उत्तर पुणे जिल्ह्यातील भाजपाचे मोठे नेते होते. लोकसभेच्या महायुतीच्या जाहीर मेळाव्यात त्यांनी दांडी मारल्याने चर्चा रंगली होती. त्यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.

ते सध्या अजित पवार गटा असलेले खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झाले होते. मात्र, दिलीप मोहिते अजित पवारांसोबत महायुतीत गेल्याने अतुल देशमुख नाराज होते. त्यातच आढळराव पाटील यांच्यावर देखील देशमुख नाराज होते. परिणामी त्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eknath Shinde On Pune Lok Sabha | पुण्यात भाऊ, तात्या कुणी नाही, मुरली अण्णाच रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Video)

Ajit Pawar On Pune Lok Sabha | रुसून बसू नका, तुमच्या माझ्या घरचं लग्न नाही, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना प्रेमळ दम (Video)

Monika Murlidhar Mohol | प्रचाराच्या रणधुमाळीत मोहोळांच्या ‘होम मिनिस्टर’ देखील आघाडीवर, पहिला टप्पा पूर्ण! मोनिका मोहोळ यांची पतीला खंबीर साथ