Pune Yerawada Crime | पुणे : जीवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी, सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerawada Crime | जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन पाच लाख रुपये मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी (Yerawada Police) अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.9) रात्री सव्वा नऊच्या सुमारास गुंजन चौकातील (Gunjan Chowk Pune) इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर घडला. पोलिसांनी आरोपीला बुधवारी अटक केली आहे.

ऋतिक दत्ता सारगे Hrithik Dutta Sarge (वय-21 रा. आंबेडकर चौक, येरवडा) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत राकेशराजे हनूमंतराजे तोटे पाटील (वय-48 रा. वडगाव शेरी) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आरोपी सारगे याच्यावर आयपीसी 387, 341 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सारगे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर कोरेगाव पार्क (Koregaon Park), येरवडा, समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) गुन्हे दाखल आहेत.(Pune Yerawada Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी रात्री गुंजन चौकातील पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकण्यासाठी
गेले होते. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांची गाडी थांबवली. मी तुला इथून जाऊ देणार नाही.
तु मकरंद मोहन बिरंजे यांची केस मागे घे नाहीतर मी तुला संपवून टाकीन अशी धमकी आरोपीने दिली.
फिर्यादी यांनी त्यांची गाडी पुढे घेतली असता आरोपी पुन्हा त्यांच्याजवळ आला.
मला जर तू पाच लाख रुपये दिले नाहीतर मी तुला जीवे सोडणार नाही, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Vijay Shivtare | ‘तुम्ही मला मूर्ख समजू नका’, विजय शिवतारेंबाबत अजित पवारांनी मांडली भूमिका (Video)

Shirur Lok Sabha Election 2024 | शिरूरमध्ये भाजपला ‘दे धक्का’, अतुल देशमुख शरद पवार गटात प्रवेश करणार!

Supriya Sule On Mahayuti Govt Maharashtra | आमची लढाई ही दडपशाही विरोधात, सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र