Pune Yerawada Crime | वाहनांवर कोयते व दगड मारून तोडफोड, सहा जणांवर FIR; येरवडा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Yerawada Crime | घरासमोर पार्क केलेल्या वाहनांवर कोयता आणि दगड मारुन वाहनांची तोडफोड केली. तसेच आरडाओरडा करुन हातातील कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवल्या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.17) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरातील पांडु लमान वस्ती (Pandu Laman Vasti) येथील भोर चाळीत घडला आहे.

याप्रकरणी जुगनू राकेश परदेशी (वय-40 रा. भोरी चाळ, बद्रिप्रसाद परदेशी चौक, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून सोहम शशी चव्हाण याच्यासह इतर पाच जणांवर आयपीसी 143, 144, 147, 148, 149, 323 सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारस आरोपी फिर्यादी यांनी त्यांच्या घरासमोर हातात कोयते व दगड घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या वाहनांवर कोयते व दगड मारुन वाहनांची तोडफोड करुन नुकसान केली. त्यावेळी वस्तीत राहणाऱ्या लोकांनी त्याठिकाणी गर्दी केली.

आरोपींनी आरडाओरडा करुन जमलेल्या लोकांना तुम्ही याठिकाणी थांबू नका नाहीतर सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवुन दहशत निर्माण केली. त्यावेळी जमलेले लोक घरात पळत जाऊन त्यांनी त्यांची घरे बंद करुन घेतली. तसेच फिर्यादी यांचा भाचा अमित सोनकर याला हाताने मारहाण केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्वे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Eknath Shinde | काय ही लाचारी… बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, संजय राऊतांचा शिंदे गटावर पलटवार

Pune Pimpri ACB Trap Case | देहुरोड विभागाचे ACP मुगूटलाल पाटील यांच्याकरिता 5 लाखाच्या लाचेची मागणी; 1 लाखाचा पहिला हप्ता घेताना ओंकार जाधव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Police Inspector Transfers | चतुःश्रृंगी, लष्कर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : बेकायदेशीर गांजा बाळगणाऱ्या दोन महिलांना अटक, सव्वा लाखांचा गांजा जप्त