मेगा भरती ! पुणे जिल्हा परिषद 1 हजार 489 रिक्त पदे भरणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागात मेगा भरती केली जाणार आहे. यासंदर्भातील निर्णयांतर्गत आरोग्य विभागातील 1 हजार 489 रिक्त पदे त्वरित भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी येत्या 15 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज पाठवायचे आहेत. यात सर्वाधिक 701 जागा परिचारिका (स्टाफ नर्स) पदासाठी आहेत. या भरतीद्वारे विविध 21 प्रकारची पदे भरली जाणार असून ही सर्व पदे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत किमान तीन महिने कालावधीसाठी (आवश्यकतेनुसार कालावधी वाढवणार) कंत्राटी पद्धतीने किंवा मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद आरोग्य समिती सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.

 या पदांसाठी भरती

1. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट, 2. सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ, 3. फिजिशियन, 4. भूलतज्ज्ञ, 5. शल्य चिकित्सक, 6. वैद्यकीय अधिकारी, 7. अधिसेविका, 8. रुग्णालय व्यस्थापक, 9. सहअधिसेविका, 10. आयुष वैद्यकीय अधिकारी, 11. स्टाफ नर्स, 12. औषध निर्माता, 13. क्ष-किरण तंत्रज्ञ, 14. ईसीजी तंत्रज्ञ, 15. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 16. ब्लॉक समुदाय व्यवस्थापक, 17. तालुका हिशोबनीस, 18. वॉर्डबॉय, 19. बेडसाईट असिस्टंट, 20. रिशेप्सनिष्ट इत्यादी 21 प्रकारची पदे भरली जाणार आहेत.

 कुठे आणि कसा कराल अर्ज

या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज स्विकारले जातील. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज https://punezp.mkcl.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 अर्जासोबत द्यावी लागतील ही कागदपत्रे :

1 अनुभव प्रमाणपत्र
2 रहिवासी प्रमाणपत्र
3 जातीचे प्रमाणपत्र
4 एक छायाचित्र
5 वयाचा पुरावा
6 पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र
7 रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र