Coronavirus : पुणेकरांची चिंता वाढली ! दिवसभरात चौघांचा मृत्यू तर ‘कोरोना’चे 135 ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण, बाधितांचा आकडा 2380 वर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात कोरोनानं कहरच केला आहे. पुण्यातील बाधितांची संख्या देखील लक्षणीय आहे. आज दिवसभरात तब्बल 135 रूग्णांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता पुण्यातील कोरोना रूग्णांची संख्या 2380 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

बाधित रूग्णांपैकी जवळपास 70 क्रिटीकल रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये 12 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील अ‍ॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही 1414 आहे. एकूण रूग्णांपैकी ससून रूग्णालयात 284 तर नायडू हॉस्पीटल आणि इतर रूग्णालयात 2096 रूग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत कोरोनाचे 140 बळी गेले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 96 रूग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Coronavirus : पुणे विभागात 3023 ‘कोरोना’बाधित, आतापर्यंत 912 रूग्ण झाले बरे

पुणे विभागातील 912 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 23 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 948 आहेत. विभागात कोरोना बाधीत एकुण 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 92 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 3 हजार 23 बाधित रुग्ण असून 163 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 657 बाधीत रुग्ण असून 146 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 827 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 684 आहे. तर 85 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्हयात 115 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 20 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 93 आहे.

सोलापूर जिल्हयात 196 बाधीत रुग्ण असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 154 आहे.

सांगली जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 27 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे.

कोल्हापूर जिल्हयात 18 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 9 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे.

आजपर्यत विभागात एकुण 30 हजार 618 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 29 हजार 610 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 374 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 26 हजार 244 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 3 हजार 23 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागात 88 लाख 49 हजार 655 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 81 लाख 47 हजार 952 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 159 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.