Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा;स्मार्ट लायन्स् संघ अंतिम फेरीत !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –Punit Balan Group Women’s Premier League | अ‍ॅल्थिट्युड स्पोर्ट्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित सातव्या ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धेत आयेश शेख हिच्या कामगिरीमुळे स्मार्ट लायन्स् संघाने वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबचा १० गडी राखून धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली. (Punit Balan Group Women’s Premier League )

 

मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्टस् क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबला पहिल्यांदा फलंदाजी करताना केवळ ५० धावाच जमविता आल्या. माधुरी आगव हिलाच फक्त दुहेरी धावसंख्या गाठता आली. स्मार्ट संघाच्या रोहीनी माने (२-६), किरण नवगिरे (२-१४) आणि वैष्णवी के. (२-१७) यांनी अचूक गोलंदाजी करून वॉरीयर्स संघाच्या डावाला खिंडार पाडले. हे आव्हान स्मार्ट लायन्स्ने ६.२ षटकात पूर्ण केले. आयेशा शेख हिने नाबाद ३४ धावा तर, करीष्मा शिंदे हिने नाबाद १४ धावा करून संघाचा सहज विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

 

उपांत्य फेरीः सामन्याचा संक्षिप्त निकाल –

 

वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लबः १५.३ षटकात १० गडी बाद ५० धावा (माधुरी आगव १९, रोहीनी माने २-६, किरण नवगिरे २-१४, वैष्णवी के. २-१७) पराभूत वि. स्मार्ट लायन्स्ः ६.२ षटकात बिनबाद ५३ धावा (आयेशा शेख नाबाद ३४ (२२, ७ चौकार), करीष्मा शिंदे नाबाद १४); सामनावीरः आयेशा शेख.

Web Title :- Punit Balan Group Women’s Premier League | 7th Puneet Balan Group Women’s Premier League T-20 Cricket Tournament; Smart Lions team in the final!

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Tonsillitis Causes Symptoms And Treatment | टॉन्सिलाईटिस बरीच वेदनादायक ! जाणून घ्या त्याची कारणे आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग

Ketki Chitale | केतकी चितळेच्या अडचणीत वाढ ! ‘तुका म्हणे’ या शब्दावर देहू संस्थानचा आक्षेप

Ayurvedic Remedies For Heat Stroke | उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी जाणून घ्या आयुर्वेदिक उपाय

Pune Crime | भाडेतत्वावर मोटार घेऊन त्याची परस्पर विक्री करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 30 लाखांच्या 8 मोटारी जप्त

Pune Crime | पुण्यात 10 हजारांमध्ये Fake Voter ID, PAN Card? बनावट ID, ‘पॅन’ तयार करणार्‍या बुलढाणा जिल्हयातील खामगावमधील इस्टेट एजंटला अटक