Punit Balan | बालन दांम्पत्याच्या हस्ते मानाचा पहिला ग्रामदैवत श्री. कसबा गणपतीला चांदीची मूर्ती अर्पण

पुणे : Punit Balan | मानाचा पहिला गणपती श्री. कसबा गणपतीसाठी (Kasba Ganpati) ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Pune) विश्वस्त आणि उत्सव प्रमुख श्री. पुनीत बालन (Punit Balan) यांनी चांदीची मूर्ती भेट दिली. पुनीत बालन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी धारीवाल- बालन (Janhavi Dhariwal Balan) यांनी शनिवारी विधिवत पूजा करून बाप्पाची ही सुंदर आणि आकर्षक अशी चांदीची मूर्ती मंडळाचे अधक्ष्य श्रीकांत शेटे (Shrikant Shete) यांच्या कडे सुपूर्त केली.

पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती असल्यामुळे संपूर्ण गणेशोत्सवात कसबा गणपतीला भाविक दर्शनासाठी आवर्जुन येत असतात. या मंदिरात गणपती बाप्पाची चांदीची मूर्ती अधिक शोभून दिसेल या विचाराने आणि गणपती बाप्पावर असलेल्या श्रद्धेतून ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळा’चे विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी बाप्पाची चांदीची मूर्ती भेट दिली. विधीवत पूजा करुन ती मंदिराकडे अर्पण केली. यावेळी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्यासह इतर विश्वस्त, भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. चांदीच्या मूर्तीच्या माध्यमातून मानाच्या गणपतीची सेवा करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. भविष्यातही गणपती बाप्पाची आणि बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याची संधी मिळत रहावी, अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रीया यावेळी पुनीत बालन यांनी दिली. (Punit Balan)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

24 September Rashifal : मेष आणि सिंह सह या चार राशीच्या जातकांसाठी दिवस शुभ, मिळतील लाभाच्या अनेक संधी

खा. सुप्रिया सुळे, पोलिस आयुक्त रितेश कुमार, एडीजी अमिताभ गुप्ता, अभिनेत्री नुश्रत भरूच्चा,
भाजप आ. निरंजन डावखरे यांनी घेतले ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पांचे दर्शन

Nana Patole | ‘वंचित समाजातील मुलांना शिक्षणापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न’, नाना पटोलेंचा समूह शाळांच्या निर्णयाला तीव्र विरोध