Nana Patole | ‘वंचित समाजातील मुलांना शिक्षणापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न’, नाना पटोलेंचा समूह शाळांच्या निर्णयाला तीव्र विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने (State Government) कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळा (Zilla Parishad School) एकत्रित करण्याचा विचार केला आहे. पण आता यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकार जिल्हा परिषद शाळा कमी करण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याची टीका विरोधक करताना दिसत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर या निर्णयावरुन टीका केली आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (Right to Education Act) मुलांना घरापासून 20 किलोमीटरच्या परिसरात शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे पण जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील मुलांना शिक्षणांपासून वंचित ठेवणारा असून पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा, अशा थेट इशाराच नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारला दिला.

कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा विचार सरकार करत आहे.
मात्र यावरुन सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सरकारवर टीका करत म्हणाले, कमी पटसंख्येचे कारण देत सरकार जिल्हा
परिषदेच्या जवळपास 15 हजार शाळा बंद करुन समूह शाळा (Group School) सुरु करणार असल्याच्या बातम्या
प्रसिद्ध झालेल्या आहेत. या शाळांमधून 1 लाख 85 हजार विद्यार्थी शिकत आहेत तर 29 हजारांपेक्षा जास्त शिक्षक
कार्यरत आहेत. शिक्षणाची गंगा वाड्या वस्त्यापर्यंत पोहचावी यासाठी राज्यातील अनेक महापुरुषांनी शाळा सुरु केल्या.
पण हे सरकार गरिब, मागास, वंचित समाजातील मुलांना शिक्षणापासून दुर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
गाव व वस्तीवरील शाळा बंद केल्यास दूर शिक्षण घेण्यासाठी लहान मुलांना पायपीट करावी लागेल.
ग्रामीण, दुर्गम भागात वाहनाची व्यवस्था नाही अशा परिस्थितीत 20 किलोमीटरच्या क्षेत्रात एकच शाळा ठेवण्याचा
निर्णय निर्बुद्धपणाचा व कसलाही विचार न करता घेतलेला दिसत आहे. अशा शब्दांमध्ये नाना पटोले (Nana Patole)
यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.

पटोले पुढे म्हणाले की, समूह शाळेचा प्रयत्न यापूर्वीही केला होता पण तो अपयशी ठरला आता पुन्हा नवीन शैक्षणिक
धोरणात समूह शाळेचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे 15 हजार शाळा बंद होऊन या शाळांमध्ये शिक्षण
घेणारे सामान्य कुटुंबातील मुले-मुली शिक्षणांपासून वंचित होतील. खाजगी महागडे शिक्षण ग्रामीण, दुर्गम व वाड्या वस्त्यांवरील मुलांना परवडणारे नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar) यांनी यासंदर्भात तातडीने खुलासा करणे गरजेचे आहे. याप्रश्नी काँग्रेस आवाज उठवेल व गरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ देणार नाही, असा कडक इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | महिला डॉक्टरची सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, डॉक्टर पतीसह चार जणांवर FIR; दिघी परिसरातील घटना