Pune Fire | आगीत सापडलेले सोन्याचे दागिने अग्निशामक दलाने केले परत; लक्ष्मी रोडवरील सराफाच्या कार्यालयात लागली होती आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Fire | ज्वेलर्सच्या कार्यालयाला (Jewelers’ Office) लागलेल्या आगीत (Pune Fire) कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग विझविल्यानंतर अग्निशमन दलाच्या (Pune Fire Brigade) जवानांनी त्यातून दागिन्यांचे बॉक्स एकत्र करुन ते सराफाला परत केले. लक्ष्मी रोडवरील (Laxmi Road Pune) सोन्या मारुती चौकातील (Sonya Maruti Chowk) युनिटी अपार्टमेंटमधील तिसर्‍या मजल्यावर एका सराफाचे कार्यालय आहे. (Pune Crime)

या कार्यालयातील टेबलाच्या खणात सोन्या चांदीचे दागिने ठेवण्यात आले होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या कार्यालयातून धूर येत असल्याचे दिसल्यावर नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले. तातडीने ३ गाड्या घटनास्थळी आल्या. तेथील सुरक्षा रक्षकाने गेट उघडून दिले. लाकडी वासे, फर्निचरमुळे आत आग लागून खूप धूर साठला होता. (Pune Fire)

त्यामुळे आत नेमके काय हे समजू शकत नव्हते. जवानांनी धूर कमी करुन आत जाऊन पाणी मारुन आग विझविली. आगीत कार्यालयातील सर्व फर्निचर, लॅपटॉप व इतर साहित्य जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी पाणी मारल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. तेथील टेबलांमध्ये सोन्याचे दागिन्यांचे बॉक्स असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाली. तेव्हा, त्यांनी या सर्व जळालेल्या साहित्यातून हे बॉक्स शोधून ते या व्यावसायिकाला परत केले.

Web Title : Punr Fire | The gold ornaments found in the fire were returned by the fire brigade; The fire broke out at Jewelers’ Office on Laxmi Road Pune12:53 PM

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI