Pushpa : The Rise | ब्लॉकबस्टर ‘पुष्पा’ चित्रपटाला चक्क ‘या’ 5 दिग्गज कलाकारांनी दिला होता नकार…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अलीकडेच दक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा (Pushpa)’ 17 डिसेंबर 2021 रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आला. ‘पुष्पा (Pushpa : The Rise)’ या चित्रपटानं संपूर्ण भारत भर धूमाकुळ घातला. या चित्रपटात (Pushpa : The Rise) अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी मुख्य भूमिका साकारली असून, त्यांनी आपल्या अभिनयामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

‘पुष्पा (Pushpa : The Rise)’ चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदांना (Rashmika Mandanna) जरी असले, तरी देखील मुख्य भूमिकेसाठी दुसऱ्या कलाकारांची नावं सुचित करण्यात आली होतीं. समोर आलेल्या माहितीनुसार अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu), तर अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) यांना ‘पुष्पा’ मध्ये काम करण्यास विचारलं असता, त्या दोघांनी या चित्रपटासाठी नकार दिला. तर इतर अनेक कलाकारांनी पुष्पाला नकार दिला होता. बघूया कोणकोणत्या कलाकारांनी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ला नकार दिला होता.

· महेश बाबू (Mahesh Babu) :

माहितीनुसार दिग्दर्शक सुकुमार यांनी ‘पुष्पा’ चित्रपटाची स्क्रिप्ट महेश बाबू यांना दाखवली असता, महेश बाबूनं मेकओव्हर करून पडद्यावर नकारात्मक भूमिका करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे ‘पुष्पा’मधील मुख्य भूमिकेला तो मुकला.

 

· दिशा पटानी (Disha Patani) :

‘पुष्पा’ या चित्रपटातील अत्यंत गाजलेलं गाणं ‘ओ अंतवा (Oo Antava).’ या गाण्यासाठी दिग्दर्शकांनी दिशा पटानीची निवड केली होती. मात्र काही कारणामुळं तिनं या ऑफरला नकार दिला.

 

· समंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) :

समंथाला मुख्य भूमिकासाठी म्हणजेच ‘श्रीवल्ली’ची भूमिका साकारण्यासाठी ऑफर करण्यात आली होती. मात्र अनेक कारणांमुळं तिनं या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारण्यास नकार दिला. परंतु त्यानंतर ही भूमिका रश्मिकाला मिळाली. दरम्यान मुख्य भूमिका न करताच चित्रपटातील प्रसिद्ध आइटम सॉन्ग ‘ओ अंतवा (Oo Antava)’ हे समंथानं केलं. या आईटम सॉन्गला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.

 

· नोरा फतेही (Nora Fatehi) :

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर म्हणून ओळखली जाणारी नोरा. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिनं हिट गाणे दिले आहेत. तसेच तिला चित्रपटातील आयटम सॉन्ग ‘ओ अंतवा (Oo Antava) ’ ची ऑफर आली होती. त्यासाठी दिग्दर्शकांनी तिच्याशी संपर्क साधला. मात्र नोरानं मोठ्या रकमेची मागणी केली असल्यामुळे, तिनं गाण्यात चमकण्याची संधी गमावली.

 

 

· विजय सेतुपती (Vijay Sethupati) :

विजय सेतुपती यांना अग्निशामक अधिकाऱ्याची भूमिकेसाठी दिग्दर्शकांनी ऑफर दिली होती. मात्र त्यांच्या बिझी शेड्युल आणि इतर कारणांमुळे त्यांनी ऑफर नाकारली.

Web Title : Pushpa : The Rise | pushpa 5 actors who rejected allu arjun rashmika mandannas starrer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’