5 वर्षाच्या कार्यकाळात ‘या’ राष्ट्रपतींनी दिली 3 पंतप्रधानांना शपथ, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी राष्ट्रपती रामास्वामी वेंकटरामन यांना आजच म्हणजे 22 ऑगस्ट 1984 ला देशाचे उपराष्ट्रपती म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले. ते देशातील असे एकटे राष्ट्रपती होते ज्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात अनेक राजकीय उलथापालथी पाहिल्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात एक-दोन नाही तर आपल्या कार्यकाळात 4 पंतप्रधान पाहिले आणि 3 पंतप्रधानांना शपथ देखील दिली.

वकील ते राष्ट्रपती
वेंकटरामन यांची राजकीय यात्रा बरीच मोठी राहिली. ते काँग्रेसचे सदस्य होते. त्यांनी स्वतंत्र्य लढ्यात देखील सहभाग घेतला होता. ते पहिल्यांदा वकील बनले, त्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले त्यानंतर ते केंद्रात कॅबिनेट मंत्री झाले आणि त्यानंतर उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती.

जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते, तेव्हा 1987 साली देशाचे 8 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांच्या आधी जैल सिंह हे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळात अनेक राजकीय उलथापालथी घडल्या, परंतू या काळात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका झाली नाही.

राजकीय उलथापालथ
राजीव गांधी यांचे सरकार 1988 साली निवडणूक हारले. यानंतर देशात पहिल्यांदाच गठबंधन सरकार आले. त्यानंतर व्ही पी सिंह पंतप्रधान झाले. परंतू 1989 मध्ये सत्तेत आलेले हे सरकार एक वर्ष देखील टिकू शकले नाही. तेव्हा वेंकटरामन यांनी चंद्रशेखर यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. परंतू हे सरकार देखील फक्त 8 महिने टिकून राहिले. त्यानंतर देशात पुर्ननिवडणूका घोषित झाल्या.

याच निवडणूक प्रचारादरम्यान माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची चेन्नईमध्ये पेरांबुदूर येथे हत्या करण्यात आली. 90 च्या पूर्ण निवडणूकीत काँग्रेसचा चांगले यश मिळेल. यानंतर राष्ट्रपती म्हणून वेंकटरामन यांनी चौथ्या पंतप्रधानांना शपथ दिली.

शक्यता होती की वेंकटरामन यांनी राष्ट्रपतीच्या स्वरुपात आणखी एक कार्यकाळी मिळेल, परंतू ती जागा शंकर दयाल शर्मा यांनी देण्यात आली. शंकर दयाल शर्मा यांना देखील चार पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, ज्यात तीन पंतप्रधानांना त्यांनी शपथ दिली.

सर्वात आव्हानात्मक काळ
वेंकटरामन यांच्या कार्यकाळ सर्वात आव्हानात्मक ठरला. यावर त्यांनी एक पुस्तक देखील लिहिले. 1992 मध्ये राष्ट्रपती पद सोडल्यावर ते चेन्नईत रहायला लागले. 2009 मध्ये त्यांचे आजाराने निधन झाले.

मिसाइल कार्यक्रम सुरु केला
त्यांना 80 ज्या दशकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सर्वात विश्वासू मंत्री मानले जात होते. त्यांना अर्थ मंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून देखील पद भूषवण्याची संधी मिळाली. त्यांनी या काळात भारतीय मिसाइल कार्यक्रमाला देखील प्रोस्ताहन दिले.

त्यांना एपीजे अब्दुल कलाम यांना अंतराळ कार्यक्रमापासून मिसाइल कार्यक्रमाकडे शिफ्ट केले, जेणे करुन भारत मिसाइल तयार करण्यासाठी आपल्या पायावर उभा राहिले. ते संरक्षण मंत्री असताना मिसाइल डेवल्पमेंट प्रोग्राम सुरु करण्यात आला होता.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like