Radhakrishna Vikhe Patil | ‘निवडणुकीत मतदारांना ‘पाकीट’ वाटप करावेच लागते’, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे खळबळजनक विधान

वैजापूर/छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शनिवारी वैजापूर येथील तहसील कार्य़ालयाच्या (Vaijapur Tehsil Office) नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. हात जोडून रडल्याने सहानभूती मिळते मतदान (Voting) मिळत नाही, निवडणुकीत मतदारांना ‘पाकीट’ वाटप करावेच लागते. तेव्हा निवडणूक (Election) जिंकली जाते, असे विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी म्हटले आहे.

 

वैजापूर येथे सुमारे 9 कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या तहसील कार्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad), ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे (Haribhau Bagde), आमदार रमेश बोरनारे (MLA Ramesh Bornare), जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे (Collector Astik Kumar Pandey) यांच्यासह शिवसेना (Shivsena) व भाजपचे (BJP) सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

 

राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, माझे कुटुंब-तुमची जबाबदारी अशा पद्धतीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अडीच वर्षे फेसबूक लाईव्हद्वारे मुख्यमंत्रिपद उपभोगून महाराष्ट्राचा कारभार ठप्प केला. त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न केस समजणार अशी टीका त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले, पाणंद रस्त्याची (Panand Road) कामे रखडल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाची वाहतूक करताना अडचणी येत आहेत.
मात्र, यापुढील काळात सर्व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करुन त्यांना नंबर दिले जातील.
जेणेकरून या रस्त्यांचे कायमस्वरूपी अस्तित्व राहील. या कामासाठी 60 ते 70 हजार कोटी रुपयांचा
आराखडा विचारधीन असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

 

 

 

Web Title :  Radhakrishna Vikhe Patil | radhakrishna vikhe patil statement money have to give to voters politics vote bank

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा