Radhakrishna Vikhe Patil | ‘शरद पवार आंदोलकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत’, विखे पाटलांचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) हे मराठा समाज आरक्षणावरुन (Maratha Reservation Protest) पेटलेल्या घटनेचा राजकीय फायदा घेत आहेत. आंदोलनकर्त्यांना ते भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केला आहे. शरद पवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा राजीनामा मागण्याचा नैतीक अधिकार नाही. आरक्षण घालवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) राजीनामा घ्यायला हवा होता, का घेतला नाही? असा प्रति टोला विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी लगावला.

पुण्यात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर (Canal Advisory Committee) राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) माध्यमांशी बोलत होते. जालना जिल्ह्यातील घटनेबाबत त्यांना विचारले असता त्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकारने (State Government) घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या अहवालात नेमकं काय असेल ते स्पष्ट होईलच. परंतु त्यापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी शांतता ठेवावी. यापूर्वी 58 मोर्चे शांततेत काढले होते, असेही विखे पाटील म्हणाले.

मविआ ने आरक्षण घालवलं

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोग नेमून सर्वोच्च न्यायालयापर्यंत (Supreme Court) मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे लढवला. याबाबत त्यांनी सकारात्मक आणि खंबीर भूमिका घेतली होती. म्हणून आरक्षण मिळाले होते. परंतु, त्यानंतर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) हे आरक्षण घालवण्याचे काम केले. आता तीच मंडळी राजकारण करत आहेत. मवीआचे नेते नकारात्मक भूमिका घेऊन आंदोलनकर्त्यांना भडकवत आहेत. हा राजकीय श्रेयाचा मुद्दा नाही. विरोधकांनी राजकारण थांबवावं असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

शरद पवार सोयीचे राजकारण करत आहेत

शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. हे आरक्षण घालवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच राजीनामा (Resignation) त्यांनी का घेतला नाही. आरक्षण गेल्यावर पवार त्यावेळी का गप्प राहिले, सोयीची घटना असल्यास ते बोलतात. जालन्यातील घटनाही त्यांच्यासाठी सोयीची असल्याने ते आता राजकारण करत आहेत, असा टोला विखे पाटील यांनी लगावला. पवारांचा हा पारंपारिक स्वभाव असल्याचेही त्यांनी म्हटले.

ठाकरेंनी बोलताना तारतम्य बाळगावं

मराठा आरक्षणाबाबत संसदेच्या येत्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने (Central Government)
वटहुकूम जारी करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले,
हा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रश्न असून त्यांनी यात नाक खुपसू नये,
आरक्षण का गेले याचा खुलासा त्यांनी करावा. ठाकरे यांनी बोलताना तारतम्य बाळगावं,
आरक्षणासंदर्भात नेमलेल्या वकिलांची फी तसेच कागदपत्रे देखील त्यावेळच्या सरकारने पुरवली नाहीत,
असा आरोप वकिलांनी केला होता. त्यामुळे ठाकरे यांनीच प्रायश्चित्त करावं, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | ‘भाजपने मराठा समाजाची माफी मागावी’, सुप्रिया सुळेंच्या मागणीवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या-‘तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर…’

Jalna Lathi Charge | जालना लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले ‘मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी…’

Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन

Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु

Diabetes and Infertility | डायबिटीजमध्ये प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम, जाणून घ्या पुरुषांनी कोणती काळजी घ्या