राधिका आपटेचा ‘तो’ फोटो व्हायरल..

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मराठी तसेच बॉलिवुड मध्ये आपली छाप पाडणारी राधिका आपटे चे अनेक फोटो वेगवेगळ्या अंदाजात पहायला मिळतात. नुकताच तिचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ती खुपच बोल्ड दिसत आहे, ज्यामध्ये तिने स्विमिंग सुट घातला आहे. याआधी अभिनेत्री सई ताम्हणकर व नेहा पेंडसे या दोघींचे असे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. पण सध्या राधिका आपटे चा ही फोटो व्हायरल होत आहे. बॉलिवुड मध्ये स्विमिंग सुट व बिकनी घालणे हे कॉमन झाले आहे. पण मराठी चित्रपटात असे फार कमी पहायला मिळते.

https://www.instagram.com/p/BgkYoKilP5e/

मराठी अभिनेत्रींमध्ये फार कमी अभिनेत्री स्विमिंग सुट किंवा बिकनी घालून फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतात. राधिका आपटे हिने देखील फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्विमिंग सुट घालून स्विमिंगपुल मधून बाहेर येताना दिसत आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. नक्कीच हा फोटो चाहत्यांना खुप आवडला आहे यात शंकाच नाही. राधिका नेहमीच स्टायलिश लुक मध्ये तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. या फोटोत देखिल तिचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना वेड लावत आहे.

राधिका आपटे हिने अनेक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. त्याचबरोबर मराठी हिंदी व बंगाली व अन्य भाषांमधील चित्रपटात देखील काम केले आहे. राधिका आपटे ने काम केलेली पहिली ‘सेक्रेड गेम्स’ वेबसिरीज नेटफिल्क्स वर सर्वाधिक गाजली. आता ‘ सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीज च्या दुसऱ्या भागाची चाहते वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीज दुसऱ्या भागावर काम सुरु आहे. पहिल्या भागामध्ये राधिका आपटे, नवाजुद्दीन सिद्दकी, अभिनेता सैफ अली खान यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. राधिका आपटे चा पहिल्या भागात मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले. पण दुसऱ्या भागात ती दिसणार अशी शक्यता आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही ८ एपिसोड असण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/BZsUQF_lXJD/

https://www.instagram.com/p/BYXDHS7FIU2/