राफेल करारात आणखी गौप्यस्फोट होतील : राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राफेल विमान करार हा जागतिक भ्रष्टाचार असून येत्या काही दिवसात आणखी मोठे गौप्यस्फोट होतील असा दावा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शुक्रवारी) केला आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d37ad437-acf4-11e8-92be-1db91a5f9c7e’]

राफेल विमान खरेदी करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला टीकेचे लक्ष्य बनविले आहे. या संदर्भात ट्विटरवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे, राफेल विमान वास्तवामध्ये खूप दूर आणि गतीने उडते. येत्या काही आठवड्यांमध्ये हे विमान आणखी काही बंकरभेदी बॉम्ब टाकणार आहे. या ट्विटर सोबत गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राचे कात्रण शेअर केले आहे. फ्रान्स चे तत्कालीन राष्ट्रपती फ्रांन्सवा ओलॉन्द यांच्या भागीदाराला अनिल अंबानी यांच्या मनोरंजन कंपनीने मदत केल्याचा दावा केलेला आहे. ‘अनिल अंबानींना सांगा की, फ्रान्समध्ये एक मोठी समस्या आहे’ असे मोदींना उद्देशून राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राफेल डील प्रकरणातील आरोप जेटली यांनी फेटाळले