संरक्षणमंत्री सीतारमण यांच्या फ्रान्स दौऱ्यात राफेलवर होणार चर्चा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण आज तीन दिवसीय फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. हा दौरा फ्रान्सची कंपनी दसाल्ट एव्हिएशनबरोबर राफेल विमानांच्या व्यवहारावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर होत असल्याचे वृत्त आहे. सध्या राफेल खरेदी व्यवहारावरून विरोधकांनी केंद्र सरकारला सळो की पळो करून सोडले असून यामुळे केंद्र सरकारची प्रतिमाही खराब झाली आहे. मोठ्याप्रमाणात विरोधकांकडून आरोप होत असताना केंद्र सरकारकडून योग्य ते स्पष्टीकरण अद्याप करण्यात आलेले नाही.

महाआघाडीसाठी ‘सीपीएम’चाही ‘लाल झेंडा’- काँग्रेसला जोरदार धक्का

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7b6cef6-cc47-11e8-97b8-3b2303b9b9d7′]

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निर्मला सीतारमण या फ्रान्स दौऱ्यात फ्लोरेन्स पार्ली यांच्यासोबत दोन्ही देशांमधील सामरिक संबंध अधिक बळकट करण्यासंदर्भात आणि परस्पर हितांच्या वैश्विक मुद्यांवर चर्चा करणार आहेत. सीतारमण आज रात्री पॅरिसला रवाना होणार आहेत. येथे त्या पर्ली यांच्यासोबत संरक्षण विषयावर आणि द्विपक्षीय संरक्षान सहकार्य वाढविण्यावर चर्चा करतील. याचबरोबर त्या ५८ हजार कोटी रुपयांच्या ३६ राफेल जेट विमानांच्या पुर्तेतेतील प्रगतीसंदर्भातही चर्चा करतील. पंतप्रधान मोदी यांनी १० एप्रील २०१५ रोजी राफेल विमाने विकत घेण्यासंदर्भात घोषणा केली होती. विरोधकांनी या खरेदीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे केंद्र सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत.