26 जानेवारीच्या परेडमध्ये राफेल ‘गर्जणार’, दिसणार ‘चिनुक-अपाचे’ची ‘धमक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या वर्षी हवाई दलाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी हवाई दलात राफेल पासून ते चिनुक एअरक्राफ्ट देखील सामील असणार आहे. याबाबतची तयारी देखील हवाई दलाने सुरु केली आहे. परेडसाठी छोटी लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर देखील प्रदर्शित केले जातील. त्याचप्रमाणे जमिनीवरून हवेत मारा करणारे आकाश मिसाईल आणि अस्त्र मिसाईल देखील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपले कर्तब दाखवतील.

राजपथावरून दिसणार राफेलची ताकद
दोन इंजिन असलेले राफेल विमान लवकरच हवाई दलामध्ये सामील केले जाणार आहे. फ्रांसच्या कंपनीकडून निर्मिती केलेल्या या विमानाला सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान मानले जात आहे कारण याची मारक क्षमता आणि अलर्ट सिस्टीम मजबूत आहे. यासंबंधीचे ट्रेनिंग देखील वैमानिकांनी फ्रान्सला जाऊन घेतले आहे.

राफेल व्यतिरिक्त हलके लढाऊ हेलिकॉप्टर तेजस देखील यावेळी प्रदर्शनात सामील केले जाणार आहे. तेजस एकवीस हजारांच्या उंचीवर देखील उडू शकते आणि हवेतून हल्ला करू शकते.

वायुसेनेचे शक्तिप्रदर्शन
डीआरडीओकडून स्वदेशी मिसाईल अस्त्र देखील यावेळी प्रदर्शनामध्ये सामील केले जाणार आहे. जमिनीतून हवेत मारा करणारी ही मिसाईल 80 ते 110 किलोमीटर पर्यंत टार्गेट करू शकते.

अपाचे देखील दाखवणार आपली ताकद
अपाचे हेलिकॉप्टरची पहिली तुकडी भारतात आली असून आठ अपाचेचा समावेश हवाई दलात करण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरीस, हवाई दलाला एकूण 22 अपाचे हेलिकॉप्टर उपलब्ध असतील. हे हेलिकॉप्टर पंजाबमधील पठाणकोट आणि जोरहाट एअरबेसवर तैनात केले जाणार आहेत. पायलट्सना त्यांच्या विमानासाठी प्रशिक्षणही देण्यात आले असून लवकरच ते या अभ्यासाचा भाग होतील.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अमेरिकन हेलिकॉप्टर चिनूक आणि हल्ला करणारे अपाचेही हवाई दलाची ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहेत. वायुसेनेच्या चिनाच्या ठिकाणी तीन चिनूक हेलिकॉप्टर उडवल्यानंतर अपाचे आकाशात कलाबाजी करताना दिसतील. चिनूकला नुकतीच हवाई दलात समाविष्ट करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा –