Rahatani Pimpri Crime | पिंपरी : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची अॅसिड पिऊन आत्महत्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Rahatani Pimpri Crime | हुंड्याच्या पैशांसाठी व चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ (Mental – Physical Torture) केला. सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने बाथरूम मधील अॅसिड पिऊन आत्महत्या केली (Married Woman Suicide). ही घटना 8 एप्रिल 2024 रोजी रहाटणी येथे संयोग कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) पती व दिरावर गुन्हा दाखल केला आहे.

सीमा राहुल पटेल असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत मयत सीमा चे भाऊ आनंद कुमार रामसुरत पटेल (वय-26 रा. माळेगाव, ता. सिन्नर जि. नाशिक मुळ रा. जलालाबाद, उत्तर प्रदेश) यांनी बुधवारी (दि.17) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती राहुल मुन्ना पटेल (वय-27) व रोहित कुमार मुन्ना पटेल (वय-25 दोघे रा. संयोग कॉलनी, श्रीनगर, रहाटणी मुळ रा. सराय वीका रोड, जौनपुर, उत्तर प्रदेश) यांच्यावर आयपीसी 306, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपनिरीक्षक भरत माने (PSI Bhart Mane) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या बहिणीचा डिसेंबर 2023 पासून छळ करत होते. आरोपी हे फिर्यादीला हुंड्याच्या पैशासाठी व गाडीसाठी माहेरून आठ ते दहा लाख घेवून ये म्हणून छळ करत होते.
तसेच पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ, मारहाण करत शारिरीक व मानसीक छळ करत होते.
त्यांच्या छळाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने 8 एप्रिल रोजी रात्री बाराच्या सुमारास बाथरूममधील अॅसिड पिऊन आत्महत्या केली.
बहिणीचा मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे पीएसआय माने यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात