जागतिक कुस्ती स्पर्धेत मराठमोळ्या राहुल आवारेची ‘ऐतिहासिक’ कामगिरी

मुंबई : वृत्तसंस्था – महाराष्ट्राच्या राहुल आवारे याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्याने 61 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ग्राफचा 11-4 असा पराभव केला. भारताचे हे या स्पर्धेतील पाचवे पदक ठरले आहे. यापूर्वी दीपक पुनियाने दुखापतीमुळे 86 किलो वजनी गटाच्या अंतिम स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

राहुल आवारे याने अमेरिकेच्या टेलर ग्राफचा पराभव करून जागतिक कुस्तीत पदक जिंकणारा महाराष्ट्राचा पहिला पैलवान ठरला आहे. राहुलने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीत 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला. त्याने 2018 मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले. राहुलने कनिष्ठ आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.

महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारेने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. 61 किलो वजनी गटात कांस्य पदकावर राहुलने आपले नाव कोरले. महाराष्ट्र जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळवणारा तो पहिलाच पैलवान ठरला आहे. त्यांने अमेरिकेच्या पैलवानाचा पराभव करून हे पद जिंकत ऐतिहासीक कामगिरी केली आहे.

Visit :- policenama.com