Rahul Gandhi | ‘ते घाबरत नसते, तर त्यांनी कधीच या पत्रावर सही केली नसती’; राहुल गांधींची सावरकरांवर पुन्हा टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हिंदुत्वाचे मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी काल त्यांच्या भाषणात टीका केली होती. त्यानंतर भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde Group) गटाकडून त्यांची प्रचंड टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेळकेंनी (Rahul Shelake) तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा बंद करण्याची मागणी केली होती. या सर्वांना उत्तर म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) आता थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पत्र घेऊन पत्रकारांसमोर उपस्थित झाले.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हे पत्र दाखवले आहे. हे पत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिले असल्याचा दावा राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केला. “सावरकरांचे एक पत्र आहे. त्यांनी हे पत्र इंग्रजांना लिहिलेले आहे. हे पत्र इंग्रजीत आहे. ‘सर मला तुमचे नोकर म्हणून राहायचे आहे,’ असे सावरकर या पत्रामध्ये म्हणालेले आहेत. फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हे पत्र पाहायचे असेल तर त्यांनी पाहावे. सावरकरांनी इंग्रजांची मदत केली होती,” असे पत्र दाखवत राहुल गांधी म्हणाले.

“गांधी, नेहरू, पटेल हे कित्येक वर्षे तुरुंगात होते. मात्र त्यांनी कोणत्याही पत्रावर सही नाही केली.
सावरकर यांनी या पत्रावर घाबरून सही केली होती. ते घाबरत नसते, तर त्यांनी कधीच या पत्रावर सही केली नसती.
त्यांनी जेव्हा या पत्रावर सही केली, तेव्हाच त्यांनी पटेल, नेहरू आणि गांधी यांना धोका दिला,”
असेही राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतु रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी राहुल गांधींच्या अटकेची मागणी केली आहे.

Web Title :-  Rahul Gandhi | rahul gandhi criticizes veer savarkar showed letter written to british devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrapur Murder Case | तीन महिन्याने बाहेर आला खुनाचा कट, मुलीने कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे आई अटकेत

Pune Pimpri Crime | हातचालाखीने ATM काढून घेत वृद्धाची 85 हजारांची फसवणूक, तळेगाव दाभाडे मधील प्रकार