Rahul Kanal On Aaditya Thackeray | ‘या देशात कसाबचं ऐकलं गेलं, पण तिकडे आमचं…’, राहुल कनाल यांची ठाकरे परिवारावर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rahul Kanal On Aaditya Thackeray | एकीकडे ठाकरे गट मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात (BMC Corruption) मोर्चा काढत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल शनिवारी (दि.1) शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. कोरोना काळात राहुल कनाल चांगला होता मग आता तो वाईट का झाला असा सवाल राहुल कनाल यांनी विचारला आहे. ज्यांनी पक्षासाठी काही केलं नाही त्यांना पक्षात स्थान दिलं जातंय अशी टीका कनाल यांनी केली आहे. (Rahul Kanal On Aaditya Thackeray)

राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरे (Rahul Kanal On Aaditya Thackeray) आणि युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मी जे करतोय ते योग्यच आहे, मला जे लोकांनी सांगितलं तेच मी करतोय. पक्ष वाढवत असताना तुमची नियत चांगली असते. आम्ही गल्ली गल्लीत पक्ष वाढवला. तुम्हाला जर काही अडचण असेल तर माझ्यावर कारवाई करा पण इतरांवर कारवाई का करता? राहुल कनाल कोरोना काळात तुमच्यासाठी चांगला होता. मग आता का तो वाईट झाला? सोशल मीडियावर कोण काय करतंय हे मला माहित आहे. पण लक्षात ठेवा सोशल मीडिया मला पण येतं. काही वेळा लीडरची मजबुरी असते कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ते. त्यांनी माझ्यापेक्षा कोणाला तरी सरस निवडलं. बॉस इस अल्वेज राईट, असे राहुल कनाल म्हणाले.

या देशात कसाबचं ऐकलं गेलं, पण तिकडे…

ज्यांना पक्षाचं काही पडलं नाही त्यांना पक्षात स्थान दिलं जात असल्याची टीका राहुल कनाल यांनी केली. वरुण सरदेसाई एवढा मोठा नाहीय की युवा सेनेच्या विरोधात जाईल. मी गेल्या 20 वर्षापासून राजकारणात आहे आणि वरुण सरदेसाईचं वय 26 आहे. या देशात कसाबचं ऐकलं गेलं, पण तिकडे आमचं ऐकलं जात नाही. कोणाला सन्मान दिला जावा हे समजलं गेलं पाहिजे, अशा शब्दात राहुल कनाल यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मला ठाकरेंनी थांबवलं की नाही मला माहित नाही, पण पक्ष सोडून जायला मात्र मजबूर केलं असा गंभीर आरोप कनाल यांनी केला आहे.

Web Title :  Rahul Kanal On Aaditya Thackeray | shivsena rahul kanal on aditya thackeray uddhav thackeray kanal joins eknath shinde shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Actress Kajal Aggarwal | दाक्षिणात्य अभिनेत्री काजलने शेअर केली रकुल प्रित सिंग, समंथा आणि तमन्नासाठी खास स्टोरी

Buldhana Bus Accident | ‘…ज्या मार्गाला शापित म्हणताय, त्याचे नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे’, संजय राऊतांच्या टीकेला राणा दाम्पत्याचे प्रत्युत्तर

Top Monsoon Getaways near Pune: Explore Nature’s Beauty and Adventure

CM Eknath Shinde | ‘वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात आवश्यक ते सर्व केले जाईल’, बुलढाणा अपघातस्थळाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया (व्हिडिओ)

Uddhav Thackeray on Buldhana Accident | या अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, बुलढाणा दुर्घटनेवरुन उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका

Disha Patani | अवॉर्ड नाईटमधील रिव्हिलिंग ड्रेसने दिशा पाटनीवर खिळल्या नजरा; चाहत्यांनी केल्या कमेंटस्