Rahul Narwekar | आदित्य ठाकरेंच्या राज्य सरकारवरील टीकेला राहुल नार्वेकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ”तरच सरकार कोसळेल”

मुंबई : Rahul Narwekar | ३१ डिसेंबरपर्यंत राज्य सरकार (State Govt) कोसळेल, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता. सरकारवर केलेल्या या टीकेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पक्षांतर बंदी झाली की नाही, हा निर्णय आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) घ्यायचा नाही तर, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे, असा टोला नार्वेकर यांनी लगावला आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले, सरकार पडणार की नाही, हे सभागृहातील बहुमतावर अवलंबून आहे. कुणाच्याही भविष्यवाणीकडे पाहण्याची मला आवश्यकता नाही. कारण, संविधानात सरकार पडणे आणि टिकण्याबाबत तरतुदी आहेत. संख्याबळ असेल, तर सरकार टिकते. विधिमंडळात संख्याबळ नसेल, तरच सरकार कोसळेल.

नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेताना पुढे म्हटले की, पक्षांतर बंदी
कायद्याचे उल्लंघन झाले की नाही, हा निर्णय आदित्य ठाकरेंना घ्यायचा नाही.
हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. त्यामुळे मी विधानसभा अध्यक्ष असल्याने सर्व नियम,
संवैधानिक आणि १० व्या अनुसूचीनुसार तरतुदींचे पालन करून अपात्रतेचा निर्णय घेणार आहे.
कुठेही पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असेल, तर उचित कारवाई करेन.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे…
आदित्य ठाकरे म्हणाले, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सरकार पडणार म्हणजे पडणारच.
राज्यातील सत्तासंघर्षावर सध्या सुनावणी सुरू आहे. अध्यक्ष मोहदयांकडे जे ट्रिब्यूनल म्हणून काम करत आहेत,
त्यांनी संविधानानुसार घटनाबाह्य सरकार पाडून एकतर निवडणूका जाहीर कराव्यात किंवा यांना बाद करणे अपेक्षित आहे.
तर आणि तरच राज्यात लोकशाही जीवंत राहील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | नातेवाईकांच्या नावाने फर्म बनवून इंनटेक्स कंपनीला 2 कोटींचा गंडा; पिंपरी चिंचवड परिसरातील प्रकार; 22 वर्षीय तरुणीसह परराज्यातील चौघांवर FIR

NCP MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर, छगन भुजबळांसारख्या…