Rahul Narwekar | आमदार अपात्रतेप्रकरणी राहुल नार्वेकर म्हणाले, ”राजकीय फटाके फुटायला अजून वेळ, जनसामान्यांना अपेक्षित…”

मुंबई : Rahul Narwekar | राजकीय फटाके सातत्याने फुटत असतात. परंतु, आज आपण केवळ दिवाळीच्या फटाक्यांबद्दल बोलणे उचित राहील. कारण राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे, असे वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केले आहे. ते मुंबईतील कुलाबा कोळीवाडा येथे दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

आमदार अपात्रता प्रकरणावर (MLA Disqualification Case) विचारले असता नार्वेकर म्हणाले, तुम्ही त्याची काळजी करू नका, राजकीय फटाके फुटण्यास थोडा वेळ बाकी आहे. जनसामान्यांना अपेक्षित निर्णय होणे गरजेचे आहे. लोकशाहीत असे निर्णय होत असताना ते संवैधानिक चौकटीत व्हायला पाहिजेत.

राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, असे निर्णय शाश्वत ठरायला हवेत. हे निर्णय टिकून कसे राहतील, याचा विचार करणे अपेक्षित आहे. आपले सरकार संवेदनशील आहे,
विधीमंडळही संवेदनशील आहे. त्यामुळे येत्या काळात आपण एक शास्वत आणि टिकाऊ निर्णय घेऊ.
त्याला विधीमंडळाची साथ मिळेल. राजकीयदृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय होणे अपेक्षित आहे.
त्यासाठी कायद्यात असणाऱ्या तरतुदी, संविधानातील तरतुदींचे पालन केले जाईल.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राहुल नार्वेकर यांना शिवसेना (Shivsena)
आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेऊन ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश दिले आहेत.
यासंबंधी निर्णय घेण्यात विलंब होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा अतिशय कठोर शब्दात नार्वेकर यांना सुनावले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शरद पवारांच्या कथित ओबीसी दाखल्यावर सुप्रिया सुळेंचा खुलासा, ते ज्यावेळेस दहावीला होते…