Rahul Narwekar | ‘आणखी सकारात्मक बदल होणार असतील तर…’, जपान दौऱ्यावरुन आलेल्या राहुल नार्वेकरांचे सूचक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political News) अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र त्यावर अजित पवारांनी स्पष्टिकरण देऊन चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे जपान दौरा (Japan Tour) अर्धवट दौरा सोडून महाराष्ट्रात परत आले. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, आता स्वत: राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी जपान दौऱ्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्रात राजकीय बदल होणार आहेत का? कारण तुमी तुमचा जपान दौरा अर्धवट सोडून आला आहात, असे विचारले असता राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, माझा जपान दौरा अर्धवट राहिलेला नाही. माझा दौरा अगदी यशस्वी झाला आहे. जपानला गेल्यानंतर आम्ही तेथील अनेक मुलभूत सुविधांच्या प्रकल्पांची पाहणी केली आहे. कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचीही (Waste Management Project) पाहणी केली. जपानमधील सगळ्या महत्त्वाच्या बैठका उरकून महाराष्ट्रात आलो असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या सगळं व्यवस्थित सुरु आहे

महाराष्ट्रात बदलाचं वातावरण पाहायला मिळत आहे, काही राजकीय बदल होऊ शकतो का? यावर बोलताना नार्वेकर म्हणाले, सध्या राज्यात सगळं व्यवस्थित सुरु आहे. सभागृह आणि शासनही व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे तुम्ही नेमका कोणता बदल म्हणत आहात, याची मला कल्पना नाही. शासनाच्या कामाचा वेग चांगला पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकारात्मक बदल होणार असतील तर…

विधीमंडळ सदस्य अत्यंत चिकाटीने काम करत आहेत. दिवसातील साडेनऊ तास कामकाज झालं आहे.
दीडशेहून अधिक लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली. अशा एकंदरीत राजकीय स्थितीत आणखी सकारात्मक बदल
होणार असतील तर त्याचं स्वागतच होईल, असं सूचक विधान राहुल नार्वेकर यांनी केलं.

अगदी वेळेत आलो

वेळेच्या आधी जपान दौऱ्यावरुन परत येण्याचे कारण विचारलं असता नार्वेकर म्हणाले,
मी वेळेच्या आधी जपान दौऱ्याहून परत आलो नाही. अगदी वेळेत आलो आहे.
जपान मधील सगळ्या महत्त्वाच्या बैठका उरकून मी याठिकाणच्या महत्त्वाच्या बैठका उरकण्यासाठी आलो
असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

Web Title :- Rahul Narwekar | vidhansabha speacker rahul narvekar japan visit ajit pawar joining bjp with 40 mlas

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम ब्रँच : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणार्‍या 3 सट्टेबाजांना तळेगाव दाभाडेमध्ये अटक (Video)

Gulabrao Patil | ‘चौकटीत राहून बोलावं, नाहीतर पाचोऱ्याच्या सभेत घसून…’, गुलाबराव पाटलांचा इशारा

Congress Leader Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, सूरत न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली