Video : राहुल रॉयनं हॉस्पिटलमधून शेअर केला व्हिडीओ ! म्हणाला…

पोलिसनामा ऑनलाइन – 1990 साली आलेल्या म्युझिकल ब्लॉकबस्टर सिनेमा आशिकी (1990 Blockbuster Movie Aashiqui) मधील बॉलिवूड अ‍ॅक्टर राहुल रॉय (Rahul Roy) ब्रेन स्ट्रोक नंतर मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. दि 2 डिसेंबर रोजी (वार बुधवार ) त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. राहुल आता ICU मधून सामान्य रूममध्ये शिफ्ट झाला आहे. आता तो निरोगी आहे. राहुलनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.

राहुलनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याच्या सोबत त्याची बहिण देखील दिसत आहे. पोस्ट शेअर करताना त्यानं लिहिलं की, मी ठिक होत आहे. माझ्या मित्रांना, कुटुंबीयांना आणि चाहत्यांना धन्यवाद त्यांनी मला खूप प्रेम दिलं आणि माझ्यासाठी प्रार्थना केल्या. मी लवकरच परत येईन. लव्ह यु ऑल.

व्हिडीओत राहुल बहिणीचा आधार घेत उभं राहताना दिसत आहे. व्हिडीओत तो काहीही बोलत नाही. परंतु त्याला पाहून वाटत आहे की, तो लवकर बरा होत आहे. त्याची बहिण सर्वांचे आभार मानताना दिसत आहे.

राहुलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आशिकी या सिनेमानंतर त्यानं प्यार का साया, बारिश, जुनून, गजब तमाशा, दिलवाले कभी ना हारे अशा अनेक सिनेमात काम केलं आहे. याशिवाय फिर तेरी कहानी याद आई, सपने साजन के, नसीब असेही त्याचे काही सिनेमे सांगता येतील. त्यानं टीव्ही शोज देखील केले आहेत. 2006 साली आलेल्या बिग बॉस च्या पहिल्या सीजनचा तो विनर आहे.