आशिकी फेम राहुल रॉय यांना आला ब्रेन स्ट्रोक, नानावटी रुग्णालयात केलं दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 1990 मध्ये ‘आशिकी’ या सुपरहिट चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणारा अभिनेता राहुल रॉय ब्रेन स्ट्रोकचा बळी ठरला आहे. कारगिलमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होते. पण शूटिंग दरम्यान अचानक तब्येत खालावली आणि तातडीने त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीटीआयच्या म्हणण्यानुसार राहुल यांना दोन दिवसांपूर्वी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

राहूल रॉय ठरले ब्रेन स्ट्रोकचे शिकार
या अहवालानुसार 52 वर्षीय राहुल रॉय सध्या आयसीयूमध्ये आहेत. त्यांना प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आला आहे. परंतु असे सांगितले जात आहे की अभिनेता सुरक्षित आहे आणि उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहे. रिकव्हर होण्यास त्यांना थोडा वेळ लागू शकेल. बऱ्याच दिवसानंतर एका चित्रपटात अभिनय करणाऱ्या राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे सर्वांना धक्का बसला. अभिनेत्याचे सर्व चाहते त्यांच्या त्वरित बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

आशिकी चित्रपटातून कमावले नाव
राहुल रॉय यांच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलताना अभिनेताने 1990 साली आशिकीच्या माध्यमातून पदार्पण केले. त्या चित्रपटामुळे त्यांना इतकी प्रसिद्धी मिळाली की त्यानंतर त्यांनी थेट 47 चित्रपटांमध्ये काम केले. पण आशिकी नंतर अभिनेत्याची कारकीर्द फक्त मंदावली नाही तर ते प्रसिद्धीपासून दूर गेले. यानंतर, बिग बॉसचा सीझन 1 जिंकल्यानंतर राहुल पुन्हा एकदा चर्चेत आले परंतु ज्या टप्प्यात अपेक्षेने होते त्या अपेक्षीत ध्येयापर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. आता इतक्या वर्षांनंतर अभिनेता LAC-Live the Battle या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता या चित्रपटाचे शूट कारगिलमध्ये करत होता. परंतु प्रकृतीमुळे हा प्रोजेक्ट देखील मध्यभागी अडकला आहे.

You might also like