Raigad Irshalwadi Landslide | ‘दुर्घटनाग्रस्तांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी 50 कंटेनर्स, गावकऱ्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची (Raigad Irshalwadi Landslide) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 103 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. दरड कोसळल्याची (Raigad Irshalwadi Landslide) घटना समोर आल्यानंतर एनडीआरएफची पथकं (NDRF Teams) घटनास्थळी रवाना झाली आहेत. याशिवाय मुंबई आणि पनवेलहून तीन बचाव पथकं इर्शाळवाडी गावात दाखल झाली आहेत. मागील अनेक तासापासून इर्शाळवाडी येथे बचावकार्य सुरु आहे. घटनास्थळी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पोहचले आहेत.

इर्शाळवाडी दुर्घटनेचा (Raigad Irshalwadi Landslide) आढावा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बचाव कार्यादरम्यान 103 लोकांची ओळख पटवण्यात प्रशासनाला यश आलं असून 12 जणांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच, काही नागरिक भातशेतीच्या कामासाठी इतरत्र गेले असून काही मुले आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, या ग्रामस्थांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी 50 कंटेनर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन देखील करण्यात येणार असून त्याबाबत जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी ही वाडी वसलेली असल्याने आणि मदतीसाठी कोणीतही साधने आणता येणे शक्य नसल्याने फक्त माणसांच्या मदतीने इथे मदत पोहोचवता येणे शक्य होत आहे. स्थानिक नागरिक, एनडीआरएफ, एसडीआरएफ (SDRF), टीडीआरएफ (TDRF) यांच्या पथकांच्या माध्यमातून याठिकाणी प्रत्यक्ष मदतकार्य सुरू असून इतर सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती आणि सततचा पाऊस असूनही लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan),
स्थानिक आमदार महेश बालदी (MLA Mahesh Baldi),
आमदार प्रशांत ठाकूर (MLA Prashant Thakur),
आमदार आदिती तटकरे (MLA Aditi Tatkare) तसेच
रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे (Raigad District Collector Dr. Yogesh Mhase) उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच घेणाऱ्या
महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक

Pune BJP Felicitated Pune Police | पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस अंमलदार
प्रदीप चव्हाण व अमोल नाझण यांचा सत्कार